आंतरराज्य सामान्यज्ञान स्पर्धेत नागनवाडी येथील धनंजय विद्यालयाच्या वैभव गुरवला बालवीर पुरस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

11 January 2020

आंतरराज्य सामान्यज्ञान स्पर्धेत नागनवाडी येथील धनंजय विद्यालयाच्या वैभव गुरवला बालवीर पुरस्कार

नागनवाडी (ता. चंदगड) येथील सामान्यज्ञान स्पर्धेतीतल यशस्वी विद्यार्थ्यांच्यासोबत शिक्षक. 
चंदगड / प्रतिनिधी
बालवीर सामान्य ज्ञान स्पर्धा बेळगुंदी येथील अंतरराज्य सामान्यज्ञान स्पर्धेत नागनवाडी (ता. चंदगड) येथील धनंजय विद्यालय व ज्युनियर कॉलेजचा कु. वैभव सिताराम गुरव याने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही विभागात पहिला क्रमांकाने येण्याचा मान मिळवला आहे. दहा हजार रुपये रोख व बालवीर पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात येणार आहे.
याच बरोबर या स्पर्धेत धनंजय विद्याला मोठे यश मिळाले आहे. माध्यमिक गटात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांची नावे - कुमार मधुरा दशरथ पाटील (चौथी), निखिल शिवाजी मोरे (पाचवा), तन्वी मातोंडकर (आठवा), स्वप्नील मनोहर पाटील (आठवा), संस्कार सुधाकर माने (आठवा). प्राथमिक गटात यश मिळालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे - शैलेश कृष्णा धूडूम( तिसरा), आयान रियाज शेख (पाचवा), चिंतामणी संदीप पाटील (सातवा), वेदांत कल्पेश शिंदे (सातवा), सौरभ संजय कोळी (दहावा), सुनील सुभाष पाटील (अकरावा) या सामान्य ज्ञान स्पर्धेत यश मिळविले. दरवर्षाप्रमाणे धनंजय विद्यालय नागनवाडीची परंपरा कायम ठेवून बालवीर पुरस्कारासह नावलौकिक मिळवले आहे. सर्व विद्यार्थ्यांना पुरस्कार व मेडल मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्यांना प्राचार्य श्री. देवमनी यांचे व  सर्व शिक्षकांचे  मार्गदर्शन लाभले.


No comments:

Post a Comment