हत्तींचा बंदोबस्त करा, अन्यथा हत्तीच्या कळपासमोरच आत्मदहन करू; जांबरे ग्रामस्थांचा वनविभागाला इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

24 January 2020

हत्तींचा बंदोबस्त करा, अन्यथा हत्तीच्या कळपासमोरच आत्मदहन करू; जांबरे ग्रामस्थांचा वनविभागाला इशारा

संग्रहित छायाचित्र
चंदगड / प्रतिनिधी
जांबरे (ता. चंदगड) येथे वनहत्तीच्या कळपाकडून  गेल्या रोज मोठ्या प्रमाणात नुकसान सुरू आहे. हत्ती कडून शिवारातील पिकांच्या नुकसानीचे सत्र सुरुच आहे. वनविभागाने तात्काळ वनहत्तींचा बंदोस्त न केल्यास रविवार २६ जानेवारी रोजी शिवारात हत्तीच्या कळपासमोर आत्मदहनाचा इशारा जांबरे येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी वनविभागाला दिला आहे. 
         जांबरेसह परिसरातील शेतकरी हत्ती, गवारेडे, वाघ या हिंस्त्र प्राण्यांपासून उपद्रव्यामुळे हैराण झाले आहेत. शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. हत्ती, गवारेड्यांच्या कळपापासून शेती तर उद्ध्वस्त झाली आणि शेतकरीसुद्धा वर्षभर शेतीत मेहनतकरून प्रसंगी कर्ज काढून शेतीला बि-बियाणे, खते वापरून शेती पिकवायची आणि हातातोंडाशी आलेला घास ऐन सुगीच्या हंगामामध्ये हत्तीनी फस्त करायचा. शेतकऱ्यांनी काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सहा महिन्यापासून हत्ती जांबरे मुक्कामी आहेत. चार दिवसापासून पाच हत्तींचा कळप दाखल झाला आहे. या कळपाकडून ऊस, काजू, केळी, आदी पिकांचे नुकसानीबरोबर शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करून वरिष्ठ अधिकाऱ्यांसमेवत घटनास्थळवर भेट देऊन शेतकऱ्यांना दिलासा न दिल्यास शेतकरी मुलांबाळांसह २६ रोजी हत्तीच्या कळपासमोर अखेरचा श्वास घेणार आहेत, असा इशारा विष्णू गावडे, गजानन गावडे, गोपाळ गावडे, यशवंत गावडे, नामदेव गावडे, बाबली गावडे, लक्ष्मण गावडे, स्मिता गावडे, सखाराम गावडे, गुंडू गावडे, नामदेव गावडे, संतोष गावडे यांनी दिला करून प्रसंगी कर्ज काढून शेतीला बि-बियाणे, खते वापरून शेती पिकवायची आणि हातातोंडाशी आलेला घास ऐन सुगीच्या हंगामामध्ये हत्तीनी फस्त करायचा. शेतकऱ्यांनी काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सहा महिन्यापासून हत्ती जांबरे मुक्कामी आहेत. चार दिवसापासून पाच हत्तींचा कळप दाखल झाला आहे. या कळपाकडून ऊस, काजू, केळी. आदी पिकांचे नुकसानीबरोबर शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करून वरिष्ठ अधिकाऱ्यासमेवत घटनास्थळवर भेट देऊन शेतकऱ्यांना दिलासा न दिल्यास शेतकरी मुलांबाळांसह २६ रोजी हत्तीच्या कळपासमोर अखेरचा श्वास घेणार आहेत, असा इशारा विष्णू गावडे, गजानन गावडे, गोपाळ गावडे, यशवंत गावडे, नामदेव गावडे, बाबली गावडे, लक्ष्मण गावडे, स्मिता गावडे, सखाराम गावडे, गुंडू गावडे, नामदेव गावडे, संतोष गावडे यांनी दिला.

No comments:

Post a Comment