शिनोळी येथील विद्यार्थींनींनी सादर केली वेणुध्वनी रेडिओ केंद्रावर स्वातंत्र्यावर नाटीका - चंदगड लाईव्ह न्युज

23 January 2020

शिनोळी येथील विद्यार्थींनींनी सादर केली वेणुध्वनी रेडिओ केंद्रावर स्वातंत्र्यावर नाटीका

शिनोळी बु.राजर्षी शाहू विद्यालयातील  विद्यार्थींनी वेणुध्वनी 90.4 FM रेडिओ केंद्रावर स्वातंत्र्यावर नाटीका सादर, विद्यार्थींनींनी अनुभवला वेगळाच निखळ आनंद...!
वेणुध्वनी रेडिओ केंद्रावर स्वातंत्र्यावर नाटीका सादर करताना विद्यार्थींनी.
चंदगड / प्रतिनिधी
राजर्षी शाहु विद्यालय शिनोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथील ग्रामीण भागातील छोट्याशा शाळेला प्रजासत्ताक दिनानिमित्त KLE वेणूध्वनी 90.4 FMबेळगाव या रेडिओ केंद्रावर  स्वातंत्र्यावर नाटीका सादरण्याचा एक अगळा वेगळाच  विद्यार्थांना अनुभव मिळाला. ही नाटीका प्रजासत्ताक दिनी  २६ जानेवरी २०२० रोजी ठिक १.३० वा. प्रसारण होणार आहे. 
विद्यार्थांचे भावविश्व फुलविण्यासाठी हे एक वेगळेच व्यासपीठ असून व्यक्तीमत्वाच्या जडणघडणीला नक्कीच उपयोगी पडेल यासाठी रवी पाटील सर यांनी परिश्रम घेतले यामुळे  विद्यार्थींनीनी  निखळ आनंद आज अनुभवता आला. आजची पिढी कट्या - कट्यावर, पारावर मोबाईलमध्ये गुंग झाली आहे.  स्वातंत्र्य लढ्यातील हौतात्म्य पत्करलेल्या क्रांतीकारकांची आजच्या शाळकरी मुलांना  देशभक्तांची आठवण , त्यांचे आदर्श मुल्यांची चर्चात्मक संवादातून  स्वातंत्र्यावर नाटीका सादर केली. 
स्मरण स्वातंत्र्यातील देशभक्त या नाटिकेचे स्टुडिओ रेकॉर्डिंग रेडिओ केंद्रावर करण्यात आले. या विद्यालयातील इयत्ता ९ वीच्या विद्यार्थींनी अश्विनी अशोक डागेकर , श्रेया विष्णू पाटील , निकिता मुरलीधर पाटील , माया वैजनाथ पाटील , रेणुका महादेव शिंदे व रवी पाटील सर यांचा सहभाग आहे. विद्यार्थांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी शाळेतील उपक्रमशील शिक्षिक रवी पाटील तसेच या नाटकाला दिग्दर्शन तानाजी पाटील यांनी केले असून मुख्याध्यापक बी.डी.तुडयेकर, शिक्षकवर्ग यांचे मार्गदर्शन व विशेष सहकार्य सरपंच नितीन पाटील यांचे लाभले आहे. याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment