चंदगड / प्रतिनिधी
पारगड ते मोर्ले दरम्यान अर्धवट असलेल्या रस्त्याचे काम तातडीने सूरू करावे. या मागणीसाठी पारगड किल्ला संयुक्त विकास समितीमार्फत 26 फेब्रुवारी 2020 रोजी चंदगड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
वर्षभरापूर्वी या रस्त्याचे काम सुरू झाले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड हद्दीत काम सुरू होते. पण सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी वनविभाग यांच्या क्षेत्रातील मोजणी इतर अडचणी याचा पाठपुरावा करण्यासाठी वेळेत पुर्तता केली नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या निष्काळजीपणामुळे हे काम रखडले आहे. मशिनरी परत गेली आहे. या रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे या मागणीसाठी येत्या २६ फेब्रुवारी 2020 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड यांच्या कार्यालय येथे बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा पारगड किल्ला संयुक्त विकास समिती यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment