चंदगड तालुका मराठी अध्यापक संघामार्फत मराठी राजभाषा दिनाचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

25 February 2020

चंदगड तालुका मराठी अध्यापक संघामार्फत मराठी राजभाषा दिनाचे आयोजन


चंदगड / प्रतिनिधी
डुक्करवाडी-रामपूर (ता. चंदगड) येथील  विद्यालयात 27 फेब्रुवारी 2020 रोजी  मराठी राजभाषा दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.  कार्यक्रमध्ये हस्ताक्षर व भाषण स्पर्धेतील विद्यार्थ्यना गौरविण्यात येणार आहे. स्वामी विवेकानंद विद्यालय गुडेवाडीचे मुख्याद्यापक जी. व्ही. गावडे यांनी संपादित केलेल्या" शब्दकळ्या "या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमास सर्व मराठी अध्यापक, मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी २७ फेब्रुवारी गुरुवार दुपारी दोन वाजता उपस्थित रहावे असे आवाहन संघाचे अध्यक्ष एम. एन. शिवणगेकर यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment