![]() |
तुळशीदास नाईक |
गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील विविध घटकांसाठी आदीवाशी समाज बांधव गोरगरीब जनतेसाठी सामाजिक कार्य करणाऱ्या बदलापूर ठाणे येथील प्रेरणा फाऊंडेशनच्या वतीने सामाजिक शैक्षणिक, पञकार, क्रिडा, साहित्य, विविध क्षेञात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीला या संस्थेकडून पुरस्कार दिला जातो.या प्रेरणा फाऊंडेशनच्या व्दितीय वर्धापनदिनानिमित्त दिला जाणारा जिल्हास्तरीय समाजरत्न व पञकार पुरस्कार दैनिक नवप्रभा दोडामार्ग प्रतिनिधी तुळशीदास नाईक यांना जाहीर करण्यात आला आहे.
प्रेरणा फाऊंडेशनच्या संस्थापक प्रेरणा उर्फ दिप्ती गावकर यांनी दिली.येत्या २१ मार्च रोजी कल्याण येथील एका कार्यक्रमात हा पुरस्कार दिला जाणार आहे.पञकार तुळशीदास नाईक यांचे कौतुक होत आहे.या अगोदर देखील नाईक यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी गावातील रहिवासी तुळशीदास नाईक गेल्या तीस वर्षांपासून अधिक काळ पञकारीता करत आहेत दोडामार्ग प्रतिनिधी म्हणून काम पाहात आहेत.सडेतोल लिखाण त्यामुळे विविध समस्या आंदोलन यावर लिखाण केले आहे. प्रेरणा फाऊंडेशन गेल्या दोन वर्षांपासून चांगले काम करत आहेत.सामाजिक बांधिलकी काय असते या समाजभावनेने काम करतात प्रेरणा फाऊंडेशनच्या संस्थापक प्रेरणा उर्फ दिप्ती गावकर या दोडामार्ग तालुक्यातील आडाळी गावातील आहेत.पण त्यांनी आपल्या कार्याचा ठसा बदलापूर येथे उमटवला आहे. दोडामार्ग तालुक्यातील ग्रामिण भागात तसेच शहरी भागात बातमी पर्यंत धावणारे पञकार तुळशीदास नाईक यांच्या कार्याची दखल प्रेरणा फाऊंडेशनच्या संस्थापक प्रेरणा उर्फ दिप्ती गावकर त्यांचे इतर सहकारी यांनी घेऊन हा पुरस्कार जाहीर केला आहे.पुढील महिन्यात २१ मार्च रोजी कल्याण येथील आचार्य अत्रे नाट्य मंदिर कल्याण नगरपालिका येथे सकाळी १०.३० वाजता मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीत वितरण होणार आहे.
No comments:
Post a Comment