चंदगड/प्रतिनिधी
चंदगड पोलिसांनी तालुक्यातील इब्राहिमपूर व नागनवाडी जवळ दोन ठिकाणी सापळा रचून गोवा बनावटीची दारूची वाहतूक करणांऱ्यावर आज सापळा रचून कारवाई केली.
नागनवाडी जवळ नाकाबंदी केली असता रात्री पावनेएकच्या दरम्यान पांढऱ्या सिल्व्हर रंगाच्या अल्टो कार (क्रमांक एम.एच.०३-३३३२) या कार मधून सुमारे एकोनतीस हजार रूपयाची विविध प्रकारच्या गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना गुरुदेव विश्वनाथ पिलारे व त्याचा मुलगा प्रताप गुरुदेव पिलारे या दोघावर (रा.सातवणे) गोवा दारु अवैधरित्या वाहतूक करण्याच्या कारणांमुळे वहानासह ताब्यात घेऊन पोलिसांनी कारवाई केली.
इब्राहिमपूर (ता. चंदगड) येथे बबन पांडुरंग भातकांडे (वय-४३, रा. इब्राहीमपूर) हा इसम (हिरो होंडा एम.एच.०९ डी.व्हि.२८४१) वरून एका पोत्यातून गोवा बनावटीची विविध प्रकारची अवैध दारू वाहतूक करताना रविवारी रात्री १०:१५ वाजता चंदगड पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेऊन कारवाई केली. नागनवाडी जवळ व इब्राहिमपूर येथील कारवाईसाठी पोलिस निरिक्षक अशोक सातपुते यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार पो. काँ. महापूरे, देवकुळे, सनदी, गुरव यांनी इब्राहीमपूर व नागनवाडी जवळ कारवाई केली.
No comments:
Post a Comment