![]() |
कोदाळी येथे पकडलेल्या दारुसही संशयित आरोपी. |
खासगी वहानातून गोवा बनावटीच्या दारुची वहातूक करत असलेल्या बेळगाव येथील दोघा जणांना कोदाळी ते झेंडेवाडी दरम्यान पाठलाग करून चंदगड पोलिसांनी पकडले. त्यांच्या कडील होंडा सिटी गाडी नंबर GA - 03 - Y - 8376) हि चार चाकी गाडीसह गाडीतील 85,290 रूपये किमतीची दारू हस्तगत केली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, ``खासगी वहानातून गोवा बनावटीच्या दारूची वहातूक होणार असल्याची माहिती पो नि अशोक सातपुते यांना मिळाली . त्या अनुषंगाने खात्री करुन कारवाई करण्यासाठी चंदगड पोलीस ठाणेकडील पोहेकॉ रोहिदास नांगरे , पो ना दिपक पाचवडेकर , पो कॉ वडेकर व पो कॉ सुतार यांचे पथक व राज्य उत्पादन चे पोनि राजन साळुखे हे खाजगी वाहनाने जावून कोदाळी ता .चंदगड येथे जावून सापळा रचला. दरम्यान याठिकाणी होंडा सिटी कार नंबर GA - 03 - Y - 8376 ही गाडी आल्यानंतर तपासणी साठी पो कॉ वडेकर यांनी चालकास वाहन थांबविणेचा इशारा केला परंतु चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगात गाडी पळवली.यावेळी यावेळी प्रसंगावधान राखुन चंदगड पोलीसांनी खाजगी वाहनाने सदर होंडा सिटी गाडीचा झेंडेवाडी ते जेलूगडे दरम्यान पाठलाग केला गाडीसह प्रविण लक्ष्मण खनुरकर वय ३९ , (रा . अनगोळ , ता . जि . बेळगाव) , शंकर कृष्णा पाटील (वय २९ , रा . शहापुर , ता . जि . बेळगाव) या दोघाना ताब्यात घेतले व गाडीतून वहातूक होत असलेली इंपिरीअल ब्लु , रॉयल स्टॅग , गोल्डन येस विस्की , रॉयल ग्रीन व्हिस्की , ओ हेन्री व्हिस्की व किंगफिशर स्ट्रॉग बिअर अशी गोवा बनावटीची दारू (दारूची किंमत ८५ , २९० ) व (गाडीची किमत २ , ५० , ०००, होंडा सिटी कार) असा एकुण ३ , ३५ , ९२० / - रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करणेत आला. हि कारवाई चंदगड पोलीस पो नि अशोक सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ रोहिदास नांगरे , पो ना दिपक पाचवडेकर , पो कॉ संतोष वडेकर व पो कॉ सुर्यकांत सुतार तसेच राज्य उत्पादन शुल्क गडहिंग्लज विभागाचे पोनि साळुखे , स. फौ जाधव , पोनि संजय जाधव , अमोल जाधव यांनी संयुक्तपणे केली आहे.
No comments:
Post a Comment