![]() |
ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथे संत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त गावची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये सहभागी झालेले ग्रामस्थ. |
कोवाड / प्रतिनिधी
संत गाडगेबाबानी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील अज्ञान,अंधश्रद्ध,भोळ्या समजुती,अनिष्ट रूढी परंपरा दूर करण्याबरोबरच गावातील स्वछतेसाठी खर्ची घातले.त्यांनी स्वतः हाती झाडू ,फावडे,कुदळ घेऊन एक परंपरा रूढ केली,त्यांच्या याच कार्याचा वसा,आदर्श डोळ्या समोर ठेऊन ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील युवक हे गेली 2 वर्ष 30 आठवडे "एक तास गावासाठी "हा स्वछतेचा उपक्रम राबवत आहेत. संत गाडगे बाबांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण गावाने स्वछतेची कास धरण्याचा संकल्प केला. त्यांच्या कार्याला वाहून घेण्याचा निश्चय केला. प्रथम गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजन प्रा.दीपक पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रामस्वछता करण्यात आली.
![]() |
स्वच्छता कार्यक्रमात सहभागी झालेले ग्रामस्थ. |
प्रा. दीपक पाटील म्हणाले,गावाने आपल्यासाठी काय केले. यापेक्षा आपण गावासाठी काहि तरी केले पाहिजे या विचारातून गावामध्ये ग्राम स्वछता अभियान हे दर रविवारी एक तास केले जाते गेली 2 वर्ष 30 आठवडे न चुकता या अभियानाच्या माध्यमातून येथील युवक वर्ग हा ग्राम स्वछतेचे एक तास काम अविरत करत आहे.गाडगेबाबांचे विचार पुस्तकापूरते मर्यादित न राहता खऱ्या अर्थाने समाजामध्ये रुजने गरजेचे आहे.तरच आपण आपल्या बरोबरच समाजाचा विकास हा साधू शकेन.यावेळी कल्लापा पाटील,गावडु पाटील,सुनील सपताळे, शिवाजी तुपारे,अभिजित पाटील,एस जे पाटील,नितीन पाटील,राजू पाटील,आर जी पाटील,प्रकाश भोगुलकर, श्रीनाथ माडुळकर,सागर नेसरकर,बबन पाटील,नरसु पाटील उपस्थित होते.गाडगे बाबांच्या जयंती निमित्य सर्वांकडून त्यांच्या कार्याचा वसा हा इथून पुढे देखील अखंडित पणे जोमाने राबविण्याचा संकल्प करण्यात. आला.
No comments:
Post a Comment