![]() |
प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यासाठी प्रा. विजय पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची मुंबई येथे घेतली भेट |
चंदगड विधानसभा मतदार संघातील सर्व प्रकल्पग्रस्तांच्या विविध विषयांवर चंदगड येथील प्रा. विजय पाटील-जंगमहट्टीकर यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंतभाई पाटील यांची मुंबई येथे भेट घेवून प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्या सांगीतल्या.यावेळी ना.पाटील यांनी संमधीत बाबतीत योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले आहे अशी माहिती प्रा.पाटील-जंगमहट्टीकर यांनी दिली आहे.
प्रकल्पग्रस्त व इतर समस्या बाबत दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, सर्व प्रकल्पाच्या ठिकाणी देखरेख करण्यासाठी सुरक्षा चौकीदाराची नियुक्ती करण्यात यावी,प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील व्यक्तीपैकी योग्यतेनुसार एका व्यक्तीला नोकरी द्यावी,नोकरभरती प्रक्रिया सुरू करण्यात यावी,शेतकऱ्यांना त्यांच्या देय रक्कमा लवकर देण्यात याव्यात,शेतक-यांच्या जमिनी खाजगीरित्या खरेदी होवू नयेत तर१८९४च्या जमीन अधिग्रहण कायद्यानुसार योग्य तो मोबदला देवून खरेदी करण्यात याव्यात,सर्व प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनचा विचार तातडीने केला जावा,स्वेच्छा पुनर्वसन अनुदान योजनातील कोल्हापूर जिल्ह्यात रखडलेली कामे लवकरात लवकर सुरु करण्यात यावीत ईत्यादी मागण्यांचे निवेदन ना.पाटील यांना प्रा.विजयभाई पाटील-जंगमहट्टीकर यांनी दिले आहे.
No comments:
Post a Comment