आठ हजार रूपये लाच स्विकारताना चंदगडचा पोलीस लाचलुचपतच्या जाळयात - चंदगड लाईव्ह न्युज

24 February 2020

आठ हजार रूपये लाच स्विकारताना चंदगडचा पोलीस लाचलुचपतच्या जाळयात

महादेव गणपती पोवार
चंदगड / प्रतिनिधी 
आठ हजार रूपये लाच स्विकारताना  स्विकारताना चंदगड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार महादेव गणपती पोवार (वय 45, रा. महागाव, ता. गडहिंग्लज) याला कोोल्हापू येेेथील लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे .सदरची कारवाई सोमवारी सकाळी झाली. याबाबत सुळये (ता. चंदगड) येथील एका युवकाने लाचलुचपत कडे तक्रार केली होती.
याबाबत माहिती अशी, तक्रारदार व त्यांच्या वडीलांवर चंदगड पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल होता . सदर गुन्हा पुढील तपासासाठी पोलीस हवालदार महादेव पोवार यांच्याकडे होता . सदर गुन्हयाच्या तपासात मदत करणेसाठी पोवार यांनी लाचेची मागणी केली . तडजोडीअंती आठ हजार रूपये देण्याचे ठरले .यामुळे सदर तक्रारदाराने पोवार यांच्याविरोधात लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. सदर तक्रारीस अनुसरून सोमवारी सापळा लावण्यात आला होता . या सापळयात पोवार हे लाच घेताना सापडले . लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे , अप्पर पोलीस अधिक्षक सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभाग कोल्हापूरचे पोलीस उपअधिक्षक अदिनाथ बुधवंत , पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत ,पोलीस नाईक शरद पोरे , विकास माने , नवनाथ कदम , पोलीस कॉन्स्टेबल मयूर देसाई , यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

No comments:

Post a Comment