|  | 
| किणी : येथील तालुकास्तरीय कवायत संचलन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षिस स्विकारताना नागनाथ हायस्कूचे प्रशिक्षक ए. व्ही. पाटील व विद्यार्थी. | 
किणी (ता. चंदगड) येथील जयप्रकाश विद्यालयात झालेल्या तालुकास्तरीय महाराष्ट्र छात्रसेना कवायत संचलन स्पर्धेत नागरदळे येथील नागनाथ हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकाविला. सलग सहा वर्षे नागनाथ हायस्कूलने तालुकास्तरीय कवायत संचलन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करून धबधबा निर्माण केला आहे. बेस्ट कॅडेट म्हणून ओमकार गजानन सुतार (सुरुते) व साक्षी विश्वास कांबळे (किणी) यांची निवड झाली. विजयी संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्व विजयी संघाना जिल्हा समादेशक कुमार पाटील, प्राचार्य ए. एस. पाटील, मयापा माडूळकर, मुख्याध्यापक पी. जे. मोहनगेकर, मारुती, संजय गवंडी यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत तालुक्यातील १० शाळांनी भाग घेतला होता. ३३० विद्याथ्यांनी मैदनावर संचलन संचलन केले. स्पर्धेत यशवंतराव चव्हाण हायस्कूल (सुरुते) व जयप्रकाश विद्यालय (किणी) यांना विभागून द्वितीय क्रमांक देण्यात आला. कोवाड येथील श्रीराम विद्यालयाला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. भावेश्वरी विद्यालय (कानूर), दुंडगे माध्यमिक विद्यालय (दुंडगे), मल्लुनाथ हायस्कूल (कानूर खुर्द), शाहू माध्यमिक विद्यालय (शिनोळी), वसंत विद्यालय (शिनोळी) व जंगमहट्टी माध्यमिक विद्यालय (जंगमहट्टी) यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. यावेळी आर. डी. पाटील, लहू माडूळकर, नारायण मनगुतकर, ज्योतिलिंग कदम, शिवाजी हुंदळेवाडकर, निंगाप्पा जोशिलकर, नारायण जोशिलकर, आप्पाजी पुजारी, विठ्ठल मनवाडकर, महेंद्र हुंदळेवाडकर, शंकर जोशिलकर या माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा समादेशक कुमार पाटील, विठ्ठल मनवाडकर, नारायण मनगुतकर यांनी काम पाहिले. पांडूरंग मोहनगेकर, एन. टी. बेनक, एस. एस. पाटील, आर. डी. पाटील यांनी परीश्रम घेतले. एस. पी. पाटील यांनी सुत्रसंचालन केले. एन. टी. बेनके यांनी आभार मानले.
 

 
 
 
 
 
 
 
No comments:
Post a Comment