तावरेवाडी येथे 3 ते 5 मार्च रोजी मंगाईदेवी मंदिराच्या वर्धापन दिनानिमीत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

28 February 2020

तावरेवाडी येथे 3 ते 5 मार्च रोजी मंगाईदेवी मंदिराच्या वर्धापन दिनानिमीत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

तावरेवाडी (ता. चंदगड) येथील मंगाईदेवी मंदिर.
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
तावरेवाडी (ता.चंदगड ) येथील श्री.मंगाईदेवी मंदिराचा पाचवा वर्धापन दिन मंगळवार ३ मार्च ते गुरुवार ५ मार्च 2020 रोजी डॉ. विश्वनाथ पाटील यांच्या  अधिपत्याखाली व पुरोहित राजेश कुलकर्णी यांच्या मंत्रघोषत  संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमानिमित्त भजन, कीर्तन, दिंडी व  महाप्रसाद असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.    यामधे मंगळवारी सकाळी 10 वा. सुनंदा व शिवाजी कृष्णा हसबे यांच्या हस्ते मुहूर्त मेढ तर 11वा.शिवचरीत्रकार कु.ज्योती कडगावकर यांचे व्याख्यान  नेश्वर भजनी मंडळ  बाचनी यांचे संगीत भजन ,कल्मेश्वर भजनी मंडळ  मौजे कारवे यांचा हरिपाठ तसेच संध्याकाळी विजया अडसूळ यांचे प्रवचन व रात्री भाऊसाहेब पाटील (शेक्कीन होसुर) यांचे कीर्तन  होणारं आहे. बुधवार  रोजी सकाळी मुर्ती अभिषेक व धर्मीक विधी सुमित्रा व लक्ष्मण केदारी पाटील यांच्या हस्ते होणार आहे.यानंतर तुरं बे  येथील तानाजी यरनाळ यांचे संगीत भजन व महिला भजनी मंडळ म्हाळेवाडी यांचा हरिपाठ  संध्याकाळी डॉ. विश्वनाथ पाटील यांचे प्रवचन व रात्री नाशिक येथील अनिल महाराज तुपे  यांचे कीर्तन होणार आहे.
५ मार्च रोजी सकाळी पालखी मिरवणूक,गंगा  पूजन,महा आरती, गाराना व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महा प्रसादाचे पूजन गेणबा कगनकर , जानबा पाटील व जनाबाई जोतिबा पाटील यांच्या   हस्ते होणार आहे. तसेच  आजी माजी सैनिकांचा व उच्च शिक्षित विद्यार्थि यांचा  सत्कार करण्यात येणार आहे. तर रात्री कसनाळ ता. चिक्कोडी  येथील शाहिर प्रदिप सुतार यांचा शाहीरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भविकांनी या कार्यक्रमा ला  उपस्थीत राहुन श्रवण सुखाचा व  महा प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदीर कमिटी व ग्रामस्थानच्या  वतीने करण्यात आली आहे.



No comments:

Post a Comment