चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रा एस. एन. पाटील, शेजारी इतर प्राध्यापक.
|
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड प्रत्येक व्यक्तीने मातृभाषेविषयी कृतज्ञता बाळगायला हवी. स्वतःला अभिव्यक्त करण्यासाठी भाषेचा समर्थ उपयोग करायला हवा. वाचन, मनन, लेखन यांच्या सातत्यपूर्ण सरावाने माणसाचे विचार व भाषा प्रगल्भ होत जाते. भाषा आत्मसात करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केल्यास निश्चितच प्रभुत्व प्राप्त होते. मात्र त्यासाठी स्वतःमधील उणिवांचा शोध घ्यावा वन इंग्लंड सोडावा असे प्रतिपादन प्रा एस. एन. पाटील यांनी केले. चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने आयोजित मराठी राजभाषा दिनानिमित्त बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. पी. एल. भादवणकर होते.
डॉ. भादवणकर यांनी मराठीच्या बोली भाषा समृद्ध आहेत. भाषेचा विकास व व्यक्तिमत्त्व विकास या दोन्ही बाबी समांतर दिशेने प्रगत होत असतात. आत्मविश्वासाने भाषा शिकून त्यातील बारकावे समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यी वृत्तीची जोपासना करणे गरजेचे आहे. यावेळी निखील मोरे व प्रतिक्षा शिरगावकर या विद्यार्थ्यींनींनी आपली विचार मांडले. प्रा. एस. व्ही. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक व सुत्रसंचालन केले. प्रा. दिपक कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्रा. डा. एन. एस. मासाळ, रा. सु. गडकरी, प्रा. आर. के. तेलगोटे, पी. पी. धुरी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment