सुखी जीवनासाठी विज्ञानाची कास धरा - टी. टी. बेरडे - चंदगड लाईव्ह न्युज

28 February 2020

सुखी जीवनासाठी विज्ञानाची कास धरा - टी. टी. बेरडे

दि न्यू इंग्लिश स्कूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त कार्यक्रमात बोलताना टी. टी. बेरडे, शेजारी प्राचार्य व्ही.जी. तुपारे.
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी 
दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. कार्य क्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही.जी. तुपारे होते. प्रास्ताविक टी. एस. चांदेकर यांनी केले. डॉ. सी. व्ही. रमन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
"आपण विज्ञानाची साधने वापरायला शिकलो पण वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारला नाही विज्ञानाची करणी घेतली पण विचारसरणी घेतली नाही समाजात अंधश्रद्धा चिरकाळ टिकल्या त्याचे पहिले कारण आहे वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभाव हा आहे. सुखी जीवनासाठी वैज्ञानाची कास धरा " असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते टी.टी.बेरडे यांनी केले. प्राचार्य व्ही.जी. तुपारे यांनी डॉ.सी.व्ही. रमन यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाला उपप्राचार्य ए. जी. बोकडे. पर्यवेक्षक एस. आर. देवण, एम. एल. कांबळे, एन. डी. देवळे, एम. व्ही. कानूरकर, सौ. पी. एच. सुतार आदि शिक्षक  उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. आर. चिगरे  यांनी तर आभार संजय साबळे यांनी मानले.

No comments:

Post a Comment