चंदगड येथे शनिवारी शरीर सौष्ठव स्पर्धा - चंदगड लाईव्ह न्युज

28 February 2020

चंदगड येथे शनिवारी शरीर सौष्ठव स्पर्धा


चंदगड / प्रतिनिधी
चंदगड येथे हर्ष फिटनेस जीम व कोल्हापूर बॉडी बिल्डींग फेडरेशनच्या वतीने शनिवार 29 फेब्रुवारी 2020 रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी चौकात  सायंकाळी सहा वाजता "चंदगड श्री 2020" या शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा चंदगड आजरा, गडहिग्लज, भुदरगड या तालुक्यातील स्पर्धकांसाठी मर्यादित असतील. इच्छुक स्पर्धकांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. परशराम गावडे यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment