पारगड-मोर्ले रस्त्यासाठी बेळगाव-वेगुर्ला मार्गावर आंदोलनकर्त्यांनी सुमारे तासभर रास्ता रोको केला. |
पारगड - मोर्ले रस्त्याचे बंद पडलेले काम पून्हा तातडीने सुरु करण्यासाठी पारगड पंचक्रोशीतील नागरीकांनी आज तिसऱ्या दिवशीही बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आपले उपोषण सुरुच ठेवले आहे. दरम्यान आज बेळगाव-वेगुर्ला महामार्गावर चंदगड फाट्यावर सुमारे तासभर चक्का जाम आंदोलन केले. यावेळी तहसिलदार विनोद रणवरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
रास्ता रोको आंदोलनावेळी मागण्यांचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले. |
यावेळी कर्तव्यात कसूर करुन वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान केल्याने उपवनसंरक्षक एच. जी. धुमाळ यांना निलंबित करण्याची मागणी केली. वनविभागाच्या चंदगड येथील कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते गणेश फाटक यांनी दिला आहे. पारगड ते मोर्ले रस्त्याचे सुरु झालेले काम वनविभागाच्या गलथान कारभारामुळे गेले सहा महिने बंद आहे. अर्ज विनंत्या करुनही वनविभाग रस्ता कामात अडवणुक करत आहे. त्यामुळे अखेर पारगड पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार यांच्या नेतृत्वाखाली चंदगड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर गेले तीन दिवस उपोषण सुरु आहे. या दरम्यान बांधकाम विभागाचे अभियंता संजय सासणे व वनक्षेत्रपाल डी. जी. राक्षे हे उपोषणकर्त्यांच्या संपर्कात आहेत. आज शाहुवाडीचे तहसिलदार यांची भेट घेवून आरक्षित झालेल्या जमिनिची मोजमाप करुन घेण्याबाबत श्री. सासणे व श्री. राक्षे यांनी विनंती केली.
रस्त्याच्या कामासाठी ठाण मांडून बसेलेल आंदोलक. |
दरम्यान आंदोलनकर्ते रघुवीर शेलार, बुधाजी पवार, चंद्रकांत पवार, प्रदिप नाईक, रमावती कांबळे या आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांची आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. खोत यांनी तपासणी केली. या पाचही आंदोलनकांना अधिक उपचाराची गरज असल्याने त्यांना पोलिसांकरवी अधिक उपचारासाठी चंदगड येथील ग्रामीण रुग्णांलयात दाखल करण्यासाठी नेत असताना त्यांना याला कडाडून विरोध केला.
No comments:
Post a Comment