चंदगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अशोक सातपुते यांची बदली करावी, याबाबतचे पोलीस उपअधीक्षक अंगद जाधवर यांना निवेदन देताना अॅड मळवीकर. |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड पोलिस ठाण्याअंतर्गत अनेक यूवकावर अन्याय झाला आहे. त्यामुळे या सर्व प्रकराला पो. नि अशोक सातपुते जबाबदार असून त्यांची बदली करावी व अशी मागणी चंदगडच्या यूवकानी गडहिग्लज चे पोलिस उपअधिक्षक अंगद जाधवर याचेकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटले आहे कि चंदगड पोलीस पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सातपुते यांची पंधरा दिवसात बदली करावी.
रमाकांत गावडे यांच्यावर दाखल झालेल्या सर्व खोट्या गुन्ह्यांची स्वतंत्र पोलिस निरीक्षक यांचे मार्फत चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत. अमृत गावडे पार्ले याच्यावर आजपर्यंत दाखल झालेले गुन्हे व त्यांनी वेळोवेळी शासकीय मागितलेली मदत यांची चौकशी होऊन संबंधितांवर गुन्हे दाखल व्हावेत. उमगाव येथील शिवाजी गावडे यांनी केलेल्या आत्महत्येची सखोल चौकशी चंदगड पोलीस स्टेशन सोडून स्वतंत्र पोलिसांकरवी होऊन संबंधितांवर गुन्हे दाखल व्हावेत., चंदगड तालुक्यातील सर्व अवैध धंदे बंद व्हावेत ,प्रलंबित पडलेल्या माहितीच्या अधिकाराचे अर्ज त्वरीत निकालात काढावेत, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या असून या मागण्यावर 15 मार्च पर्यंत विचार पूर्वक निर्णय घेऊन त्वरित कारवाई व्हावी अन्यथा 16 मार्चपासून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा अॅड संतोष मळविकर यांनी दिला. यावेळी संबंधित पीडितांना न्याय देणे बरोबर जबाबदार व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलीस उपअधीक्षक अंगद जाधवर यांनी दिली आहे.यावेळी शिवाजी गावडे,अमृत गावडे,रमाकांत गावडे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment