चंदगड तालुक्यातील हिंडगाव येथे ‘जाण’ लघुचित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ, कलाकारांची उपस्थिती - चंदगड लाईव्ह न्युज

01 March 2020

चंदगड तालुक्यातील हिंडगाव येथे ‘जाण’ लघुचित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ, कलाकारांची उपस्थिती

हिंडगाव (ता. चंदगड) येथे जाण लघुचित्रपटाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित कलाकार.
चंदगड / प्रतिनिधी
कोल्हापूरमधील चंदगड तालुक्यापासून जवळपास असणाऱ्या हिंडगाव या गावी नुकताच ‘जाण’ या लघुचित्रपटचा शुभारंभ कार्यक्रम पार पाडण्यात आला.यावेळी उपसरपंच गुणाजी भोसले,सचिन दळवी,बाळू नाईक,भरत भोसले,आदी कलाकार आणी ग्रामस्थ उपस्थित होते.या कार्यक्रम समारोपप्रसंगी दिग्दर्शक रोशन कुंभार यांनी मनोगत व्यक्त करताना, ’लवकरच हा लघुचित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल आणी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करेल’ असा विश्वास येथील लोकांना दिला.
सु-क्षण एन्टरटेनमेंट निर्मित ‘जाण’ या लघुचित्रपटमध्ये, माणुसकी,कर्तव्य,उपकार यांची परतफेड हि ‘जाण’स्वरुपात कशी उदयास येते हे’ पाहायला मिळते तर दुसरीकडे माणसाने माणसाबद्दल दाखवलेल्या माणुसकीच्या नात्याबद्दल आठवण करून देणारा संदेश या लघुचित्रपटमधून दिसून येतो.
सु-क्षण एन्टरटेनमेंट निर्मित याअगोदर ‘ छाप’, ‘लेडीज फस्ट’ हे लघुचित्रपट प्रसिद्ध झाले होते,या दोन्ही लघुपटला घवघवीत यश मिळत प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती त्यामुळे आता ‘जाण’ या लघुचित्रपटकडेही लक्ष लागून राहिले आहे.या सर्व लघुपटचे दिग्दर्शन रोशन कुंभार यांनी केले असून त्यांनी ‘जाण’या लघुचित्रपटसाठी येथील स्थानिक कलाकार यांना प्राधान्य दिले आहे.यामध्ये चंदगड,आजरा तालुक्यातील सहकलाकार लघुचित्रपटातून भुमिका साकारताना दिसणार आहेत.


1 comment:

Unknown said...

Chandgad is god gift

Post a Comment