पार्ले शाळेतील मुलांनी अनुभवला स्वनिर्मितीचा आनंद, बाल विज्ञान जत्रेचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

01 March 2020

पार्ले शाळेतील मुलांनी अनुभवला स्वनिर्मितीचा आनंद, बाल विज्ञान जत्रेचे आयोजन

पार्ले (ता. चंदगड) केद्रशाळेत विज्ञानदिनाचे औचित साधून बाल विज्ञान जत्रेचे आयोजन केले होते. यावेळी सहभागी विद्यार्थी प्रयोग दाखविताना
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
पार्ले (ता. चंदगड) केद्रशाळेत विज्ञानदिनाचे औचित साधून २८ फेब्रुवारी 2020 रोजी  बाल विज्ञान जत्रेचे आयोजन केले होते. केंद्रशाळेतील जवळपास १२० विध्यार्थ्यानी या प्रात्यक्षिकामध्ये सहभाग घेतला होता. यावेळी ६० प्रयोग प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. 
प्रारंभी भारताचे माजी राष्ट्रपती कै. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रजन झाले. मुख्याध्यापक अनिल पाटील  यांच्या प्रास्ताविकानंतर सुरवातीलाच  बालकांसाठी विज्ञान मनोरंजन या विषयावर  तुर्केवाडी येथील  जनता विद्यालयाचे विज्ञान अध्यापक एस. ए. पाटील यांनी आपल्या रोजच्या जीवनात विज्ञान कसे सहाय्यक आहे त्याचे विवेचन केले. 
शाळेतील वेगवेगळ्या दालनांचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. उपस्थितांनी सर्व प्रयोग पाहून, प्रत्येक प्रयोगाचे वैशिष्ठ, कृती व त्यामागील  कारणमीमांसा विद्यार्थ्यांच्या तोंडून ऐकून घेत  विद्यार्थ्यांची प्रशंसा केली. या कार्यशाळेचा लाभ विद्यामंदिर कळसगादे, विद्यामंदिर मोटणवाडी, भाई दाजीबा हायस्कूलच्या विध्यार्थ्यानी प्रयोग पाहण्यासाठी गर्दी केली होती.उद्घाटनावेळी  शा. व्य. स. अध्यक्षा सौ. संजीवनी गावडे, पार्ले ग्रामपंचायत सरपंच सौ. समृद्धी गावडे, ग्रामसेवक कोकणी, कळसगादे मुख्याध्यापक विलास पाटील, प्रतिमा मुंडे, सुनिता गावित, लक्ष्मण गावडे, खाचू गावडे, सौ. साधना गावडे, यशवंत म्हाकेकर उपस्थित होते. कार्यक्रमाला दुर्गावीर प्रतिष्ठानचे राज्याध्यक्ष संतोष होसुरकर, सदानंद सिताप, अनिल केसरकर यांनी सदिच्छा भेट दिली. अशोक चिंचणगी यांनी सुत्रसंचालन केले. विनायक पाटील यांनी  उपस्थितांचे  आभार मानले.


No comments:

Post a Comment