ओलम शुगरकडून एफआरपी प्रमाणे 31 जानेवारी अखेरची बिले 4 तारखेपर्यंत जमा करणार - भरत कुंडल - चंदगड लाईव्ह न्युज

03 February 2020

ओलम शुगरकडून एफआरपी प्रमाणे 31 जानेवारी अखेरची बिले 4 तारखेपर्यंत जमा करणार - भरत कुंडल

भरत कुंडल
कोवाड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील हेमरस साखर कारखान्याकडून एफ आर पी प्रमाणे 31जानेवारी 2020 पर्यंत ची बीले 4 फेब्रुवारी पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचे कारखाना प्रशासनचे प्रमुख भरत कुंडल यांनी प्रसिद्धीला दिले आहे.
हेमरस तथा ओलम अँग्रो प्रा. लि. कडून 10 जानेवारी 2020 अखेर पर्यंत गाळप केलेल्या ऊसाचे  होणारे बील संबधीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या आधीच जमा केले आहे. 11 तारखे नंतर ची बिले हि बुधवारी संबंधित खातेदाराच्या बँक खात्यावर जमा करत असल्याचे  म्हटले आहे.तसेच अतिवृष्टी आणि  पुरस्थिती लक्षात घेऊन 11 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी पर्यंत च्या ऊसाला प्रतीटन 2900/ रु आणि 1 मार्च नंतर च्या ऊसाला प्रति टन 2920/रु दर दिला जाईल त्या बरोबरच आतापर्यंत चालू गळीत हंगामात 02/02/2020 अखेर एकुन 84 दिवसात  कारखान्याकडून 4,45,224 मे.टन उस गाळप करण्यात आला असून एकूण साखरेचे उत्पादन हे 5,40,800 क्विंटल झाले असून एकूण 12.40 % रिकव्हरी आहे. पुरबाधित क्षेत्रातील ऊसाची उचल करण्यावर प्राधान्याने भर दिला जात असुन शेतकऱ्याना सर्वतोपरी सहकार्य हे कारखाना प्रशासनाकड़ून दिले जात आहे त्यांमुळे भागातील शेतकरी बंधुनी आपला ऊस हेमरस कारखान्याकडे पाठवावा असे म्हटले आहे.गेल्या दहा वर्ष्यात कारखाना प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या साठी उत्पादन वाढीच्या विविध योजना ह्या राबविल्या असल्यामुळे चंदगड, आजरा, गडहिंग्लज तसेच सीमा भागातून मोठ्यां प्रमाणावर ऊसाचा पुरवठा होत असुन कारखान्याने शेतकऱ्यांच्या मना मध्ये विश्वास निर्माण केला आहे. कारखान्याकड़े नोंदित क्षेत्रानुसार चालु वर्षी जवळ पास साडे सात लाख टन ऊसाचे गाळप होईल असे सांगताना यापूढे गाळप ऊसाचे बील ऊस पुरवठा केलेल्या दर दहा दिवसाने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाईल असे प्रसिद्धीला दिले आहे.

No comments:

Post a Comment