चंदगड / प्रतिनिधी
चंदगड नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी महाविकास आघाडी शिवसेनेचे फिरोज मुल्ला यांची बिनविरोध निवड झाली. तर नगरपंचायतीच्या स्विकृत नगरसेवकपदी सत्ताधारी महाविकास आघाडीचे शिवानंद हुंबरवाडी व विरोधी भाजपमधून ॲड. विजय कडुकर यांची निवड करण्यात आली. तहसिलदार विनोद रणवरे प्रमुख उपस्थित होते.
फिरोज मुल्ला शिवानंद हुंबरवाडी ॲड. विजय कडुकर |
सत्ताधारी महाविकास आघाडीकडून स्विकृत नगरसेवकपदी शिवानंद हुंबरवाडी, संतोष वणकुंद्रे, अरुण पिळणकर, प्रसाद वाडकर, तजमुल फनीबंद यांचे अर्ज आले होते. तर विरोधी भाजपकडून ॲड. विजय कडुकर, सुधीर देशपांडे यांचे अर्ज आले होते. सत्ताधारी गटाकडून दोन स्विकृत नगरसेवक पदासाठी काही काळ निवडी लाबल्या. मात्र अखेर नगराध्यक्ष प्राची काणेकर यांनी महाविकास आघाडीच्या सदस्यांशी चर्चा करुन अखेर सत्ताधारी महाविकास आघाडीकडून शिवानंद हुंबरवाडी तर विरोधी भाजपकडून ॲड. विजय कडुकर यांची निवड झाल्याचे जाहीर केले.
नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी सचिन शिंदे, नगरअभियंता ऋषिकेश साबळे यांच्यासह नगरसेवक अभिजित शांताराम गुरबे, नेत्रदिपा प्रमोद कांबळे, अनुसया श्रीकृष्ण दानी, अनित संतोष परीट, माधुरी मारुती कुंभार, रोहित राजेंद्र वाटंगी, संजीवनी संजय चंदगडकर, झाकीरहुसेन युसुफ नाईक, दिलीप महादेव चंदगडकर, नुरजहा अब्दुलरहीम नाईकवाडी, सचिन निंगाप्पा नेसरीकर, प्रमिला परशराम गावडे, संजना संदिप कोकरेकर, आनंद मारुती हळदणकर,मुमताजबी सुलेमान मदार, मेहताब आयुब नाईक, कर्मचारी वरिष्ठ सहाय्यक अनंत चंदगडकर, राजू कडुकर, प्रमोद पाटील उपस्थित होते.
No comments:
Post a Comment