दौलत-अथर्वचा दूसरा हप्ता १०० रूपये प्रमाणे जमा, तिसरा हप्त्याही देणार- अध्यक्ष मानसिंग खोराटे - चंदगड लाईव्ह न्युज

03 February 2020

दौलत-अथर्वचा दूसरा हप्ता १०० रूपये प्रमाणे जमा, तिसरा हप्त्याही देणार- अध्यक्ष मानसिंग खोराटे

मानसिंग खोराटे
चंदगड / प्रतिनिधी
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत-अथर्व इंट्राट्रेड कंपनी संचलित दौलत साखर कारखान्याचा चालू गळीत हंगामातील दुसरा हप्ता शंभर रुपयांप्रमाणे शेतकर्याच्या खात्यावर जमा केल्याची माहिती अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी सांगितले कारखाना स्थळावर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली .दिवसेदिवस साखर उतारा चांगला असल्यामुळे तिसरा हप्ताही देणार असल्याचे यावेळी त्यांनी जाहीर केले.
कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी , सभासदांनी मोठ्या विश्वासाने ऊस गळीतासाठी पाठवला आहे.त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.  आज अखेर सुमारे एक लाख ६५ हजार टन उसाचे गाळप झाले असून या हंगामात किमान ३ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले .३१ डिसेंबरअखेर गाळप केलेल्या उसाची बिले दोन हजार ६०० रुपयांप्रमाणे काढली आहेत. त्याशिवाय दुसरा हप्ता १०० रुपयांप्रमाणे काढला आहे.शेतकर्याच्या खात्यावर सोमवार पासून जमा झाले आहेत . अलिकडच्या काळात साखर उतारा वाढला असल्याने तिसरा हप्ताही देण्यात अडचण येणार नसल्याचे त्यांनी सांगितले,तसेच 1 फेब्रुवारी पासून गाळपास येणार्या उसाला प्रतिटन २७००रूपये प्रमाणे दर देणार आहे कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला परवानगी मिळाली असल्याचे सांगितले. ऊस उत्पादक , सभासद , कामगार यांच्या विश्वासावरच कारखान्याला गतवैभव मिळवून दिले जाईल , असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला . या वेळी सीईओ  प्रकाश चिटणीस , व्यंकटेश ज्योती , अनिल भगत , पी . जी . पाटील उपस्थित होते.

No comments:

Post a Comment