मानसिंग खोराटे |
हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व इंटरट्रेड प्रा. लि. लिज्ड युनिट दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याने 31 जानेवारी 2020 अखेर गाळप केलेल्या उसाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली.
दौलत कारखान्याचा कोल्हापूर जिलहा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ताबा घेवून अल्पावधीत मशिनरी दुरूस्तीची कामे करून कामगार व शेतकऱ्यांचे सहकार्याने कारखान्याचे गाळप सुरू करून शेतकऱ्यांना दिलेल्या विश्वासानुसार उसाची बिले दिले जाणार असे सांगितले होते. त्यानुसार प्रत्येक पंधरवाडयाची बिले ज्या-त्या पंधरवाडयामध्ये शेतकऱ्यांचे खातेवर जमा केली जात आहेत. अथर्व कंपनीवर विश्वास ठेऊन कारखान्यास उस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना आपण दिलेल्या विश्वासाप्रमाणे उस बिले वेळेत देणेचे नियोजन प्रशासनाने केले आहे. कारखान्याकडे 31 जानेवारी 2020 अखेर आलेल्या उसाची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली आहेत. आणि येथुन पुढे कारखान्याकडे येणाऱ्या ऊसाची बिले मुदतीत जमा करणार असलेची माहिती कारखान्याचेअध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली. त्याचप्रमाणे कारखान्याचे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी तसेच कारखान्याकडे ऊस पुरवठा करणाऱ्या या कार्यक्षेत्राबाहेरील ऊस पुरवठादारांनी आपण पिकवलेला संपुर्ण ऊस आपल्या अथर्व दौंलत कारखान्याकडे पाठवुन सहकार्य करावे, असे आवाहन अथर्वने केले आहे.
No comments:
Post a Comment