चंदगड / प्रतिनिधी
शिनोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथील मार्कंडेय नदीपात्रात चंदगड हद्दीत जोतिबा देमाणा रेडेकर यांच्या शेतालगत नदीच्या पाण्यात अनोळखी मृतदेह तरंगताना आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आढळून आला. शिनोळीचे सरपंच नितीन नारायण पाटील यांनी याबाबतची माहीती चंदगड पोलिसात दिली.
आज सकळी दहा वाजण्याच्या सुमारास शिनोळी बुद्रुक येथील मार्कंडेय नदीच्या पात्रात एक अनोळखी मृतदेह पाण्यावर तरंगताना काही लोकांना आढळून आला. याबाबतची माहीती सरपंच नितीन पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी व पोलिस पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जावून पाहणी केली. मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे पाहून त्यांनी लागलीच याबाबतची माहीती चंदगड पोलिसांना दिली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून मृतदेह बाहेर काढला. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून पो. ना. श्री. गाडवे पुढील तपास करत आहेत.


No comments:
Post a Comment