चंदगड/प्रतिनिधी
गुडेवाडी (ता. चंदगड) येथील संघर्ष मराठा मंडळ, यांच्या वतीने बुधवार, दि.१९ फेब्रुवारी २०२० रोजी ठीक ११:०० वाजता शिवजयंती निमित्ताने मराठी शाळेत जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धा लहान व मोठ्या गटात होणार आहेत. स्पर्धेला पुढीलप्रमाणे बक्षिसे ठेवण्यात आली आहेत लहान गटासाठी (१ली ते ७वी पर्यंत) २००० ,१५००,१०००,७००,५००रुपये तर मोठा गटासाठी (८वी ते ११वी)२५००, २०००, १५००,७००, -५००रुपये व दोन्ही गटासाठी चषक देण्यात येणार आहेत या शिवाय बाहेरील गावातून आलेल्या सर्व स्पर्धकांना नाष्ट्याची सोय केली आहे. अधिक माहीतीसाठी संपर्क अजित कोकितकर-८६००६७४३२४ यांच्याशी साधावा.
No comments:
Post a Comment