प्रांत ग्राहक समितीच्या वतीने अवैध धंदे बंद करण्याची तहसिलदाराच्याकडे मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

11 February 2020

प्रांत ग्राहक समितीच्या वतीने अवैध धंदे बंद करण्याची तहसिलदाराच्याकडे मागणी

चंदगड तालुक्यातील अवैध धंदे बंद करावेत, या मागणीचे निवेदन तहसिलदार यांना देताना प्रांत संरक्षण समितीचे पदाधिकारी. 
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील राजरोसपणे सुरु असणारे अवैध धंदे त्वरित बंद करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा निवेदनाद्वारे तहसीलदार चंदगड व पोलिस निरीक्षक यांना अखिल भारतीय प्रांत ग्राहक संरक्षण समिती शाखा चंदगड च्या वतीने देण्यात आला आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की, चंदगड तालुका हा शांततामय तालुका आहे. पण गेल्या काही महिन्यापासून 
तालुक्यात गोवा बनावटीच्या दारूची मोठ्या प्रमाणावर आवक वाढली आहे. त्यामुळे तरूण वर्ग आहारी जात आहे. त्याच प्रमाणे कल्याण, मुंबई मटकाही सर्वत्र चालू आहे. समितीच्या वतीने तालुका फीरून पाहील्यावर या सर्व गोष्टी लक्षात आल्या आहेत. या प्रकारामुळे तालुक्यातील शांततेला बाधा येत आहे. तरी आपण तालुक्यातील सर्व अवैध धंदे त्वरित बंद करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रांत ग्राहक समितीच्या चंदगड शाखेकडून तहसीलदार चंदगड व पोलीस निरीक्षक चंदगड यांना दिला आहे. निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष मनोज अनंत रावराणे, तालुकाध्यक्ष निलम कोदाळकर व समितीचे इतर सदस्य यांच्या सह्या आहेत.


No comments:

Post a Comment