श्रीकांत पाटील यांना राज्यस्तरीय 'शिक्षक रत्न' पुरस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

12 February 2020

श्रीकांत पाटील यांना राज्यस्तरीय 'शिक्षक रत्न' पुरस्कार

श्रीकांत वैजनाथ पाटील
कोवाड / प्रतिनिधी
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील श्रीकांत वैजनाथ पाटील यांना स्वामी विवेकानंद सेवा संस्था वाळवा जि. सांगली यांचा राज्यस्तरीय 'शिक्षक रत्न' पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराचे वितरण वेणूताई चव्हाण स्मारक सभागृह, कराड, जि. सातारा येथे रविवार दि. १६ फेब्रुवारी रोजी ना. बाळासाहेब पाटील, सहकार व पणन मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सातारा यांच्या हस्ते, आम. आनंदराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सिनेअभिनेते विलास रकटे व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. श्रीकांत पाटील हे केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असून एक उपक्रमशील, चतुरस्त्र, अष्टपैलू शिक्षक व उत्कृष्ट प्रशासक म्हणून सुपरिचित आहेत. देशाची सुदृढ भावी पिढी निर्माण करण्यासाठी त्यांनी घडविलेले संस्कारक्षम विद्यार्थी, विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून केलेले कार्त यामुळे त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. याबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रांतून अभिनंदन होत आहे.


No comments:

Post a Comment