स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांचा कस लागतो – प्रा. अहिर, कोवाड महाविद्यालयात करिअर गायडन्स - चंदगड लाईव्ह न्युज

12 February 2020

स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांचा कस लागतो – प्रा. अहिर, कोवाड महाविद्यालयात करिअर गायडन्स

कोवाड (ता. चंदगड) येथील महाविद्यालयात करिअर गायडन्स कार्यक्रमावेळी बोलताना प्रा. के. डी. अहिर व इतर. 
कोवाड / प्रतिनिधी
सद्याचे युग हे स्पर्धेचे युग असून विध्यार्थ्याचा यामध्ये कस लागत आहे. पदवी नंतर विध्यार्थ्यासमोर नेमकं काय करायचं हा प्रश्न सर्वप्रथम भेडसावणारा आहे. अशा परिस्थितीत विध्यार्थ्यानी घाबरून जाता काम नये. जागतिकीकरणाच्या आजच्या युगात विद्यार्थ्यासमोर अनेक मार्ग खुले असून विविध अशा क्षेत्रामध्ये शिक्षण घेता येते असे आवाहन कोल्हापूर सायबर कॉलेज येथील पर्यावरण शास्त्र विषयाचे प्रा. के. डी. अहिर यांनी केले. कोवाड (ता. चंदगड) येथील  कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथे विज्ञान विभाग आणि बी. एस. सी विभागाच्या संयुक्त विद्यमाने `करियर गायडन्स` या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एम. पाटील होते. 
प्रा. के. डी. अहीर पुढे म्हणाले, ``विद्यार्थ्यानी चौकस बुद्धीने अभ्यास पुर्ण निर्णय घेणे गरजेचे आहे. पारंपारिक शिक्षणापासून ते आय. टी. पर्यंत अनेक द्वारे खुली आहेत. त्यामुळे आजची गरज ओळखुन प्रॉफेशनल आणि ट्रॅडीशनल अशा विविध कोर्सची परिपूर्ण माहिती घेऊन करिअर साठी आपले क्षेत्र निवडावे. त्यासाठी सोशल मिडियाचा योग्य वापर करून घ्यायला हवा.`` पाहुण्यांचे स्वागत प्रा. अर्पिता हाणें यांनी केले. प्रा. डॉ. टी. एम. वांद्रे यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख वक्ते म्हणून यावेळी सर्वोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ ए. एस. जांभळे, सदस्य याकुब मुल्ला, आपा वांद्रे तसेच प्रा. सुहास भोगण, प्रा. विकास ओऊळकर यांच्यासहित महाविद्यालयाचे सर्व स्टाफ उपस्थित होते. प्रा. माया पाटील यांनी सुत्रसंचालन केले. प्रा. विजयमाला साळुंखे यांनी आभार मानले. 


No comments:

Post a Comment