चंदगड / प्रतिनिधी
पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. जिल्हाध्यक्ष व राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या आदेशाप्रमाणे तालुक्यातील प्रत्येक गावात बूथ वाईज काँग्रेस कमिटी स्थापन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्याप्रमाणे लवकरच बुथ कमिट्या स्थापन करण्याचे ठरले. सरकारी पातळीवर अडीअडचणी सोडवण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी कार्यालय स्थापन करण्याचे ठरले. पक्ष बळकट करण्याच्या उद्देशाने व्यापक कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली. यामध्ये रा. नि. गावडे, सुरेशराव चव्हाण- पाटील संभाजीराव देसाई - शिरोलीकर पांडुरंग कृष्णा बेनके आणि जे. बी. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच इतर कमिट्याही यावेळी स्थापन करण्याचे ठरले. जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, अनिल शिवनगेकर, महादेव मंडलिक, जयसिंग पाटील, आप्पाजी कांबळे, ॲड. रवी रेडेकर, शिवाजी सुभेदार, उदय देसाई, वैजू गावडे, यशवंत देसाई, उदयकुमार पाटील, रॉबर्ट फर्नांडिस, आप्पाजी कांबळे, बाळासाहेब हळदणकर आदी उपस्थित होते. पांडुरंग बेनके यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment