'नरवीर तानाजी मालुसरे' शहीद दिनी बेळगावात रांगोळीतून अभिवादन - चंदगड लाईव्ह न्युज

10 February 2020

'नरवीर तानाजी मालुसरे' शहीद दिनी बेळगावात रांगोळीतून अभिवादन

अजित औरवाडकर, वडगाव-बेळगाव, यांनी 'तान्हाजी' चित्रपट पोस्टवर आधारित रांगोळी काढून तानाजींना स्मृतिदिनी अभिवादन केले.
कालकुंद्री / प्रतिनिधी
नरवीर तानाजी मालुसरे यांच्या कोंढाणा किल्ल्यावरील मुघलांचा किल्लेदार उदयभान राठोड विरुद्ध झालेल्या जगप्रसिद्ध लढाईत गड जिंकूनही तानाजी शहीद झाले. 4 फेब्रुवारी 1670 रोजी या घटनेला 350 वर्षे झाली . यावेळी 'गडआला पण सिंह गेला' हे छत्रपती शिवाजी महाराजांचे  उद्गार आजही तानाजींच्या पराक्रमाची साक्ष व देशप्रेमी नागरिकांना ऊर्जा देतात. तानाजींच्या स्मृतिदिनानिमित्त नाझर कॅम्प, माधवपूर, वडगाव- बेळगाव येथील प्रसिद्ध रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी सध्या गाजत असलेल्या तान्हाजी चित्रपटाचे पोस्टर रांगोळीतून रेखाटून विनम्र अभिवादन केले. ही कलाकृती तीन × चार फूट आकाराची असून रेखाटण्यासाठी 12 तास लागले. रांगोळी साठी लेक कलर चा वापर केला गेला आहे. रांगोळी पाहण्यासाठी बेळगाव व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली.

No comments:

Post a Comment