कुद्रेमानी कृषी पतीन सोसायटीच्या चेअरमनपदी जोतिबा बडसकर, व्हा.चेअरमन मल्लाप्पा कदम - चंदगड लाईव्ह न्युज

10 February 2020

कुद्रेमानी कृषी पतीन सोसायटीच्या चेअरमनपदी जोतिबा बडसकर, व्हा.चेअरमन मल्लाप्पा कदम

जोतिबा मारूती बडसकर                    मल्लाप्पा गुंडू  कदम
मजरे कार्वे / प्रतिनिधी
कुद्रेमानी येथील प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघ नियमित कुद्रेमानी या संस्थेची निवडणूक नुकताच म.ए.समितीने निर्वादपणे जिंकली. सोसायटीच्या चेअरमनपदी जोतिबा मारूती बडसकर तर व्हा.चेअरमन मल्लाप्पा गुंडू  कदम याची एकमताने  संचालक मंडळाने निवड केली.
सदर निवडणूक ही बारा जागासाठी होती मात्र सामान्य गटामध्ये पाच यामध्ये जोतिबा मारूती बडसकर , मल्लाप्पा गुंडू कदम , जोतिबा शिवाप्पा पाटील , अर्जुन गुंडू राजगोळकर , मधू पून्नाप्पा पन्हाळकर व एससी साठी एक महादेव रामा कांबळे हे उमेदवार विजयी झाले. तसेच बिनविरोध निवड सामान्य महिला आनंदी अंबाजी गडकरी, बिनकर्जदार भैरू जोतिबा धामणेकर , ओबीसी सातेरी व्यंकट सुतार , मनोहर लोहार निवड  झाली. यावेळी निवडणूक आधिकारी दिपक चड्डीचाळ व सोसायटीचे सी.ई .ओ. बाळाराम धामणेकर यांनी निवडणूक प्रक्रिया कामकाज उत्तमरित्या पार पाडले.कुद्रेमानी येथील ही सोसायटी स्वातंत्र्यपूर्व काळातील असून शेतकऱ्याना वरदान ठरणारी ही सोसायटीची पुन्हा चेअरमन पदाची धुरा जोतिबा मारूती बडसकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तर व्हाईस चेअरमन म्हणून एकमुखी मल्लाप्पा गुंडू कदम यांची निवड करण्यात आली आहे. या बद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे. या सोसायटीची नुकताच सुसज्ज अशी नूतन वास्तू उभारण्यात आली आहे. लवकरच नूतन  वास्तूचा उदघाटन सोहळा करण्याचा  चेअरमन जोतिबा मारूती बडसकर यांनी प्रसारमाध्यमशी बोलताना सांगितले.


No comments:

Post a Comment