पत्रकारीतेतील बदल समजून घेणे गरजेचे - महेश म्हात्रे - चंदगड लाईव्ह न्युज

09 February 2020

पत्रकारीतेतील बदल समजून घेणे गरजेचे - महेश म्हात्रे

अक्कलकोट येथे जिल्हा व तालुका पत्रकार मेळाव्यात बोलताना न्यूज-18 लोकमत मुंबईचे संपादक महेश म्हात्रे, व्यासपीठावर मरठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख व अन्य मान्यवर. 
अक्कलकोट / प्रतिनिधी
पत्रकारांचे सामुदायिक अस्तित्व धोक्यात आले आहे. राष्ट्रीय राजकीय पक्षासह सर्वजण पक्षाचे अजेंडे, माहिती सांगताना वृत्तसंस्था, सोशल मिडिया, ऑनलाईन पत्रकारिता याचाच वापर केला जात आहे. काळ बदलला आहे. माध्यमे बदलली आहेत. बदलत्या काळानुसार पत्रकारांनी पत्रकारितेतील बदलते माध्यम समजून घेणे गरजेचे आहे. पत्रकारांनी हा बदल स्विकार करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन न्यूज-18 लोकमत मुंबईचे संपादक महेश म्हात्रे यांनी केले.
मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पुरस्कारस्वरुप चंदगड तालुका पत्रकार संघाला मिळालेली स्मृतिचिन्ह.
मराठी पत्रकार परिषदेची संलग्न जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आणि पत्रमहर्षि रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ, आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित कै.कल्याणराव इंगळे पॉलिटेक्नीकल कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी संपादक म्हात्रे हे बोलत होते.
मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पुरस्कारस्वरुप चंदगड तालुका पत्रकार संघाला मिळालेली मानपत्र.
मराठी पत्रकार परिषद मुंबई, अक्कलकोट तालुका पत्रकार संघ, वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट, सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मराठी पत्रकार परिषद मुंबई यांच्या वतीने आदर्श तालुका पत्रकार पुरस्कार न्यूज-18 लोकमत मुंबईचे संपादक महेश म्हात्रे, मरठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख व परिषदेचे पदाधिकारी यांच्या हस्ते स्विकारताना चंदगड तालुका पत्रकार संघाचे  अध्यक्ष नंदकुमार ढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत पाटील, खजिनदार संपत पाटील, सचिव चेतन शेरेगार, अनिल धुपदाळे, उदयकुमार देशपांडे, संजय पाटील (तेऊरवाडी), संजय पाटील, प्रकाश एेनापुरे, तातोबा पाटील, महेश बस्सापुरे व इतर पदााधिकारी. 
यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी आमदार सचिन कल्याणशेट्टी, वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष महेश इंगळे, अन्नछत्रर मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे मानद जनसंपर्कक अधिकारी बाबासााहेब निंबाळकर  मरठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख, प्रमुख उपस्थिती अध्यक्ष, मराठी पत्रकार परिषद गजानन नाईक, विश्‍वस्त किरण नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी, विभागीय सचिव पुणे बापूसाहेब गोरे, जिल्हाध्यक्ष अशोक मठपती, सरचिटणीस पी.पी. कुलकर्णी, पत्रकार हल्ला विरोधी कृति समितीचे   भगवान परळीकर, अक्कलकोट तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार जगदाळे, कल्याणराव इंगळे पॉलिटेक्नीक नागनाथ जेऊरे, नागेश दंतकाळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्याच्या निमित्ताने राज्यातील बहुतांश जिल्ह्यातून, तालुक्यातून सुमारे तीनशे पेक्षा अधिक पत्रकार बांधव उपस्थित होते.
अक्कलकोट येथे पुरस्कार वितरण कार्यक्रमावेळी एका क्षणी न्यूज-18 लोकमत मुंबईचे संपादक महेश म्हात्रे व चंदगड तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी.
प्रारंभी स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन व मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून पुरस्कार वितरण व राज्यस्तरीय पत्रकार मेळाव्याचा प्रारंभ करण्यात आला. राज्यातून आलेल्या मान्यवर अतिथींचे व पत्रकारांचे अक्कलकोट तालुका पत्रकार संघ वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थान, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांच्या वतीने स्वागत अक्कलकोट पत्रकार संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार जगदाळे यांनी केले. अक्कलकोट तालुका पत्रकार संघाच्यावतीने व ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार परषदेेचे अध्यक्ष गजानंद नाईक विश्‍वस्थ किरण नाईक यांना निवेदन देण्यात आले.
अक्कलकोट येथे राज्यस्तरीय मेळाव्याला राज्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असलेले नवोदित व जुने जाणते पत्रकार.
हा पुरस्कार वितरण सोहळा राज्यस्तरीय पत्रकार मेळावा यशस्वी करण्यासाठी सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघ विश्‍वनाथ व्होनकोरे विजयकुमार झुंजा, श्रीशैल चिंचोळीकर, मोहनकुमार मामड्याळ, संदिप मठपती, अक्कलकोट तालुका पत्रकार संघाचे सचिव शिवानंद याळवार, उपाध्यक्ष अरविंद पाटील, स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे मानद जनसंपर्क अधिकारी प्रशांत भगरे, दै. अक्कलकोट समर्थ चे संपादक प्रवीण देशमुख, कल्याणराव इंगळे पॉलिटेक्नीक कॉलेचे समस्त कर्मचारीवृंद, सोमशेखर जमशेट्टी, आदींनी परिश्रम घेतले. याप्रसंगी अक्कलकोट तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अनिल इंगळे, संस्थापक अध्यक्ष शिवलाल राठोड, मारूती बावडे, रविकांत धनशेट्टी, रियाज सय्याद, शरणप्पा फुलारी, चेतन जाधव, सैदप्पा इंगळे, समाजसेवक वसंत देडे, निरजंन चिलगेरी, चित्तरंजन अगरथडे आदी उपस्थित होते. यावेळी चंदगड तालुका पत्रकार संघाचे  अध्यक्ष नंदकुमार ढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत पाटील, खजिनदार संपत पाटील, सचिव चेतन शेरेगार, अनिल धुपदाळे, उदयकुमार देशपांडे, संजय पाटील (तेऊरवाडी), संजय पाटील, प्रकाश एेनापुरे, तातोबा पाटील, महेश बस्सापुरे व इतर पदााधिकारी उपस्थित होते. 
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम. देशमुख पत्रकारांना मार्गदर्शन करताना. 
पत्रकारांच्या विविध मागण्या संदर्भात पुढील काढात पत्रकारांना शासनाशी भिडावे लागणार आहे. पत्रकार हे प्रामाणिकपणे समाजासाठी, सरकारसाठी विना वेतन काम करतात. शासन लेखक, कलाकार, सामाजातील विविध स्तरातील लोकांना मानधन देत, तर पत्रकारांनाच का देऊ शकत नाही. असा सवाल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस. एम. देशमुख यांनी उपस्थित करून  सर्व पत्रकारांना मानधन, वेतन मिळालेच पाहिजे असा पुर्नउच्चार केला. निवृत्त वेतनासाठी पात्र असणार्‍या सर्व पत्रकारांना निवृत्त वेतन मिळालेच पाहिजे. ग्रामीण भागातील पत्रकाराला अधिक स्विकृती मिळणारच नाही असे अधि स्विकृतीचे निकष आहेत. या निकषात शिथिलता आणणे गरजेचे आहे. सरकार ठराविक दैनिकांनाच देन देत आहे. बाकिचे वृत्तपत्रांशी काही देणे घेणे नाही. पड पडताळणीचे नियम जाचक आहेत. अनेक वृत्तमानपत्रे बंद पडली पाहिजेत,अशी नियमावली आहे. पत्रकार हे स्वाभिमानाने समाजाचे व सरकारचे काम करते या करिता भविष्यात पत्रकारांना शासनाशी भिडावाच लागणार असा रोखठोक असे प्रतिपादन एस. एम. देशमुख यांनी केले.

राज्यातील तमाम पत्रकारांच्या मेळावा अक्कलकोटमध्ये होत आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांना ही कार्यशाळा प्रोत्साहान देणारी व त्यांच्या ज्ञानात भर घालणारी आहे. भविष्यात पत्रकारांच्यासाठी उन्नीसाठी पर्यायाने जनतेच्या विकासाठी पत्रकार संघटनेच्या विविध उपक्रम भविष्यात याही पेक्षा ही मोठे कार्यशाळा घेतले तर वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थान संचलित कल्याणराव इंगळे पॉलिटेक्निक कॉलेजचे सर्वोतोपरी राहील असे आश्‍वासन महेश इंगळे यांनी यावेळी दिले.
अक्कलकोट येथे पत्रकारांच्या मेळाव्यात बोलताना आमदार सचिन कल्याणशेट्टी
राज्याच्या, राष्ट्राच्या व समाजाच्या जडणघडणीत पत्रकारांचे योगदान मोठे- आमदार सचिन कल्याणशेट्टी
लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकारीता लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकारांचे विविध समस्या व उन्नतीकरिता जे काही प्रश्‍न असतील ते प्रश्‍न शासन दरबारी मांडू,व पाठपुरावा करू असे आश्‍वासन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी राज्यातून आलेल्या तमाम पत्रकारांना दिले.

No comments:

Post a Comment