![]() |
छत्रपती शिवाजी महाराज |
चंदगड तालुक्यात आज प्रत्येक गावात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहाने आणि वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा करण्यात आला. गावातील विविध मंडळांनी वेगवेगळ्या उपक्रमांच्या साह्याने शिवजयंती साजरी केली. तालुक्यात गावा-गावातून शिवज्योत आणून त्याची मोठ्या उत्साहाने तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ढोल, ताशा, लेझीम व अन्य पारंपारिक वाद्याच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली. त्यामुळे गावातील संपुर्ण वातावरण शिवमय झाले होते.
तालुक्यातील मुरकुटेवाडी येथे शिव पुतळ्याचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहाने पार पडला. मजरे कार्वे, माणगाव, चंदगड, शिनोळी, कोवाड, कुदनुर, कालकुंद्री, अडकुर, गणुचीवाडी, नांदवडे गावात वेगवेगळ्या उपक्रमाने जन्मोत्सव साजरा करण्यात आला. आज दिवसभर पोवाडे, गोंधळी गीत, संगीत भजन स्पर्धा, ढोल-ताशांच्या गजरात ऐतिहासिक ढाल पट्टा, लाटी फिरवणे, व्याख्याने अशा आनंदोत्सव वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली. काही ठिकाणी शिवजयंतीचे औचित्य साधून वीरगती प्राप्त झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांचा मानसन्मान करण्यात आला. काही ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शाळा पातळीवर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रांगोळी स्पर्धा, भाषण स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. गावागावात दारात सडा सारवण करून गावभर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तालुक्याला लाभले पारगड, कलानंदिगड, गंधर्वगड व महिपाळगड या ऐतिहासिक चार गडावरून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या परीने शिवज्योत आणून गावभर मिरवण्यात आली. यावेळेला सुहासिनीनी आरती करुन त्यांचे स्वागत केले.
No comments:
Post a Comment