चंदगड नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीला राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीने बाजी मारत चंदगड नगरपंचायतीवर आपली सत्ता आणली. नुकतीच उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदाची निवड झाली आहे. नगरपंचयात उपसमित्यांच्या नुकत्याच निवडी झाल्या.
![]() |
प्राची काणेकर फिरोज मुल्ला अभिजित गुरबे संजीवनी चंदगडकर अनिता परीट |
चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप विरूध्द राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीत लढत झाली होती. या विरोधात भाजपाने आपली ताकद लावली होती. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीला 10, भाजपला , तर ३ जागांवर अपक्ष निवडून आले होते. इतर उपसमित्यांवरील स्थायीमध्ये नगराध्यक्षा प्राची काणेकर, संजीवनी चंदगडकर, अभिजीत गुरबे, अनिता परीट, नेत्रदीपा प्रमोद कांबळे यांची निवड करण्यात आली. बांधकाम समितीवर अभिजीत गुरबे, रोहित वाटंगी, मेहताब आयोग नाईक, दिलीप चंदगडकर, प्रमिला गावडे यांची निवड करण्यात आली. महिला बालकल्याण समितीवर संजीवनी चंदगडकर, माधुरी कुंभार, अनुसया दाणी, संजना कोकरेकर व प्रमिला गावडे यांची निवड करण्यात आली. क्रीडा व सांस्कृतिक आणि शिक्षण समितीवर दिलीप चंदगडकर, अनिता परीट, शिवानंद हूबंरवाडी, मुमताजबी मदार,संजना कोकरेकर यांची निवड करण्यात आली. स्वच्छता आरोग्य व पाणीपुरवठा या समितीवर फिरोज मुल्ला, सचिन नेसरीकर झाकीर नाईक, नेत्रदीपा कांबळे, नुरजहाँ नाईकवाडी यांची निवड करण्यात आली. यावेळी गडहिंग्लज, नगर पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. डी. मुतगेकर, चंदगडचे तहसीलदार विनोद रणवरे, नायब तहसिलदार डी. एम. नांगरे, पं. स. सदस्य दयानंद काणेकर, संजय चंदगडकर, प्रवीण वाटंगी, राजेंद्र परीट, डॉ. परशुराम गावडे, प्रमोद कांबळे, ॲड. विजय कडूकर आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment