विजेच्या विविध प्रश्नांसाठी आजरा शहरातील महावितरण कार्यालयावर मनसेच्या वतीने मोर्चा. |
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
आजरा तालुक्यातील वाढीव वीज बिल कमी करणे, पूरग्रस्त शेतकऱ्यांना त्या काळात तील वीज बिल माफ करणे, सोमवार ऐवजी शनिवारी वीज पुरवठा खंडित करणे, लाईट कनेक्शन वेळेत करून देणे व इतर ज्या अडचणी शेतकऱ्यांना येत असतील तर त्या सुरळीत करून घेणे आणि वेळेत काम करून देणे अशा मागण्यासाठी दि.१७-२-२०२० रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले याच्या मार्गदर्शनाखाली आज रा शहर महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं तर एका ही अधिकाऱ्याला खुर्चीवर बसू देणार नाही असा इशारा देण्यात आला.शेतकऱ्यांच्या अडचणी असतील त्यांनी मनसे कार्यालयात आपली बिले जमा करणे व इतर अडचणी असतील तर त्यांनी मदती साठी महाराष्ट्र सैनिक काम करतील असे सांगितले नागेश चौगुले यांनी यावेळी सागितले. यावेळी तालुका अध्यक्ष अनिल निउंगरे, उपतालुकाअध्यक्षआनंदा घंटे, शहर अध्यक्ष कुणाल पोतदार,उपशहर अध्यक्ष ईकबाल हिंगलजकर,विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष प्रभात साबळे,विक्रम आराडे, भुदरगड तालुका अध्यक्ष महेश देसाई, जिल्हा सचिव संजय पाटील, कागल ता.अध्यक्ष अशोक खोत राधानगरी ता. अध्यक्ष चंद्रकांत येसाडे व मनसे सैनिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment