शालेय विद्यार्थिनींच्या युनिफॉर्म मध्ये लेगिन्स चा समावेश करा - बापू शिरगांवकर यांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

18 February 2020

शालेय विद्यार्थिनींच्या युनिफॉर्म मध्ये लेगिन्स चा समावेश करा - बापू शिरगांवकर यांची मागणी

ऑल इंडिया कौन्सिल ऑफ हुमन राईटचे  बापू शिरगावकर यांची मागणी

चंदगड / प्रतिनिधी
समाजात आज मोठ्या प्रमाणात स्त्रियांवर वर मुलीवर अत्याचार होताना दिसतात, लैंगिक छळ विनयभंग बलात्कार असे प्रकार घडत आहेत. शालेय विद्यार्थिनींच्या युनिफॉर्म मध्ये लेगिन्स चा समावेश करा,यामुळे या अनिष्ठ प्रकाराना काही  प्रमाणात आळा बसेल अशी मागणी ऑल इंडिया कौन्सिल ऑफ हुमन राईटचे सदस्य  बापू शिरगावकर यांनी  जिल्हा परिषदेचे सीईओ यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
 गेले अनेक वर्षे स्त्रीभ्रूण हत्येविरोधात वुमन राइट्स चे माध्यमातून काम सूरू आहे,शाळकरी,नोकरी निमित्त बाहेर असणार्या मूली,महिलांवर अत्याचाराबाबत अनेकांची मते आजमावली आहे अनुभवाप्रमाणे गेल्या तीन-चार वर्षांपूर्वी स्त्रीभ्रूणहत्या मागची मानसिकता ही फक्त वंशाला मुलगा हवा अशी होती पण आत्ताच्या तीन ते चार वर्षात अभ्यासात असा निष्कर्ष आला की आजचे आई-वडील हे मुलीवर होणाऱ्या अत्याचाराला घाबरून मुलींना जन्म द्यावा की नाही या विवंचनेत आहे आजचा तरुण जोडप्यांची मानसिकता पाहिली तर मुलगा किंवा मुलगी यात कोणताच फरक न मानणारी आहे मुलगा किंवा मुलगी झाली तरीही ते आनंदाने तिचं स्वागत करताना दिसतात पण ते घाबरतात की उद्या आपल्या मुलीच्या बाबतीत काही अनुचित प्रकार घडेल काय कारण आपल्या देशात याबाबत कठोर कायदा नाही असं प्रत्येकाला वाटत आहे आणि म्हणूनच की काय गेल्या तीन-चार वर्षांपूर्वी चा आणि आजचा मुलींचा जन्मदर पाहिला तर यामध्ये घट होऊन तो आज 1883 इतका झालेला दिसून येत आहे मुलींच्या वर अत्याचार घडण्याचे प्रकार आज सगळीकडे दिसून येत आहेत त्यामध्ये ज्ञानाचे मंदिर असलेल्या शाळाही चुकलेल्या नाहीत प्राथमिक शाळेपासून हायस्कूल पर्यंत मुलींचा युनिफॉर्म हा कट ब्लाउज असा आहे पण सहावी सातवी ते दहावी पर्यंतच्या मुली या वयाने मोठ्या झालेल्या असल्याने त्या शरीराने ही मोठ्या असतात आणि त्या या युनिफॉर्ममध्ये जाताना अनेकांच्या वाईट नजरा त्यांच्याकडे जातात काही शाळांमध्ये तर अगदी अखुड युनिफॉर्म आहेत त्यामुळे मुलींच्या कडे दृश्यांची नजर पटकन जाते त्याच बरोबर मुलींना शाळेत बसतांना उठताना पळताना अथवा खेळताना स्वतःच्या कपड्यांना सांभाळूनच सर्व बाबी कराव्या लागत असल्याने त्यांच्या वापरण्यावर बंधने येते यावेळी पण सोबत मुलींना नजर लेगिन्स वापरता आली तर त्यांना मन मोकळेपणाने वावरता येईल पण रस्त्याने चालतानाही त्यांच्याकडे वळणाऱ्या वाईट नजरा मध्ये देखील फरक पडेल आणि अंग भरून कपडे घातल्यामुळे शाळेतूनच संस्काराचे बीज पेरल्या सारखे होईलच आणि अनेक वाईट विचारांना काहीसा आळा बसेल एखाद्या शाळेने ्वतः उपक्रम चालू केला तरी सगळ्यात शाळा आहे चालू करतील असे नाही व सर्वांना पटायला हि खूप कालावधी जाईल त्यामुळे आपल्या शिक्षण विभागाकडून जर शाळांना अशा सूचना दिल्या तर सार्‍या शाळा याचा अवलंब करतील या विषयावर आपल्या संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करून इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या जिल्ह्यातील सर्व शाळांचा युनिफॉर्ममध्ये लेकींचा समावेश करावा अशी मागणी ऑल इंडिया कौन्सिल ऑफ ह्यूमन राइट्स चे विभागिय कार्यकर्ते बापुसाहेब शिरगावकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर जिल्हा परिषद यांच्याकडे मागणी केली आहे हे या मागणीचे पालकांतून स्वागत होत आहे.

No comments:

Post a Comment