![]() |
पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्रातील पत्रकारांचे नेते व मराठी पत्रकार परिषदेचे प्रमुख विश्वस्त एस. एम. देशमुख यांना "आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार" देण्यात आला. |
पुरंदर / प्रतिनिधी
पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्रातील पत्रकारांचे नेते व मराठी पत्रकार परिषदेचे प्रमुख विश्वस्त एस. एम. देशमुख सर यांना "आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार"माजी कृषी व सैनिक कल्याण राज्यमंत्री ना. दादासाहेब जाधवराव यांच्या शुभहस्ते सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन येथे भव्य सन्मान सोहळ्यात गौरवपुर्ण प्रदान करण्यात आला.
मराठी पञकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे,पुणे विभागीय सचिव मा.बापूसाहेब गोरे आदीसह मराठी पञकार परिषद,पुणे जिल्हा पञकार संघ व पुरंदर तालुका पञकार संघाचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील सर्व पत्रकार व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणाऱ्या या सन्मान सोहळ्यामध्ये पुरंदर हवेलीचे नूतन आमदार संजय चंदुकाका जगताप आणि पुणे जिल्ह्यातील सर्व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला.
No comments:
Post a Comment