कुदनूर येथे शिवजयंती आणि शिवस्मारक पायाभरणी समारंभ उत्साहात, महिलांचा लक्षणीय सहभाग - चंदगड लाईव्ह न्युज

19 February 2020

कुदनूर येथे शिवजयंती आणि शिवस्मारक पायाभरणी समारंभ उत्साहात, महिलांचा लक्षणीय सहभाग

कुदनुर यथे शिवजयंती आणि शिवस्मारक पायाभरणी समारंभ प्रसंगी बालचमुंनी केलेली विविधारंगी वेशभुषा.
कोवाड / प्रतिनिधी
एकादशीच्या शुभ मुहूर्ताचे औचित्य साधून समस्त ग्रामस्थांच्या वतीने साकारणाऱ्या शिव स्मारकाचा पायाभरणी सोहळा व शिवजयंती उत्सव असा संयुक्त कार्यक्रम शिवस्मारक कला,क्रीडा आणि सांस्कृतिक मंचच्या पुढाकाराने मोठ्या उत्साहात शिवमय वातावरणात सम्पन्न झाला.सकाळी नेसरी येथील सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारकावरून शिवज्योत आणण्यात आली,त्यानंतर श्री सिद्धेश्वर मंदिर पासून शिवज्योत आणि शिवदौड ला प्रारंभ करण्यात आली,संपूर्ण गावातील प्रमुख मार्गावरून शिवज्योत,पालखी आणि कलश मिरवणूक हि लेझीम,झांझ पथक,भजन टाळ मृदंगाच्या आणि  छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांच्या शिवमय वातावरणात मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली.विशेष करून यामध्ये 700 ते 800 महिला वर्गाची उपस्थिती लक्ष वेधून घेत होती,त्याबरोबरच गावातील अंगणवाडी,कुमार विद्या मंदिर,कन्या विद्या मंदिर ,हायस्कुल च्या सर्व मूला मुलींनी सहभाग दाखविला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशातील मुलं असोत किंवा जिजाऊ च्या वेशातील मुली तसेच राजांच्या मावळ्यांच्या रूपातील तरुण वर्ग या सर्वामुळे संपूर्ण वातावरण हे शिवमय होऊन एक प्रकारे याठिकाणी  वेगळेच वातावरण निर्माण झाले होते .तसेच गावातील सर्व तरुण मंडळे, ग्रामपंचायत ,सेवा सोसायटी,दूध संस्था,पतसंस्था,आणि इतर विविध घटकांनी या उत्सवात सहभाग नोंदविला.त्यामुळे या ठिकाणी साकारण्यात येत असलेल्या शिव स्मारकाच्या पायाभरणी समारंभाला वेगळीच झालर प्राप्त झाली.मोठ्या जल्लोषात काढलेल्या मिरवणुकीने सर्व जण शिवस्मारक होत असलेल्या ठिकाणी एकत्र येऊन त्याठिकाणी शिवजयंती बरोबरच नियोजित शिवस्मारकाचा पायभरणी कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी  विविध सामाजिक,राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी सुध्या याप्रसंगी उपस्थिती लावली यामध्ये शिवाजीराव पाटील,अध्यक्ष माथाडी कामगार संगटना ,भरमुअण्णा पाटील माजी रो हा यो राज्यमंत्री,शंकर आंबेवाडकर,माजी जि प सदस्य,कल्लपाना भोगण ,विलास पाटील,जि प सदस्य यांनीही उपस्थिती दाखविली,त्याबरोरच सरपंच शालन कांबळे,उपसरपंच नामदेव कोकितकर ,अशोक घाटगे,डॉ डी पी बामणे,सुरेश घाटगे,डॉ गौडाद, राजू रेडेकर, कृष्णा नौकुडकर आदी ग्रामस्थ सुध्या उपस्थित होते.तरी हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व ग्रामस्थ तसेच हितचिंतक यांनी हजेरी लावून कार्यक्रम यशस्विरित्या पार पाडल्याबद्दल शिवस्मारक मंच चे अध्यक्ष डॉ राहुल पवार,उपाध्यक्ष बाळू शहापुरकर,सचिव सागर हेबाळकर आणि खजिनदार परसु मोहणगेकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment