किणी प्राथमिक शाळेत भैरी देवाच्या यात्रेनिमित्त बालचमुनी भरवला मिनी बाजार - चंदगड लाईव्ह न्युज

19 February 2020

किणी प्राथमिक शाळेत भैरी देवाच्या यात्रेनिमित्त बालचमुनी भरवला मिनी बाजार

किणी येथे भरेलला शालेय विद्यार्थ्यांचा बाजार.
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
भैरी देवाच्या यात्रेचे औचित्य साधून मराठी विद्यामंदिर किणीच्या मुलांनी कलमेश्वर देवालयासमोर मिनी बाजाराचे आयोजन केले होते.मुख्याध्यापक ए,के,पाटील व शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष दयानंद मोटुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व मुलांनी विविध मालाची दुकाने मांडली होती.
कलमेश्वर देवालयासमोर बाजार भरविला होता.खाद्यपदार्थांचे स्ततील भाजीपाला,पूजेचे साहित्य,ताक,अंडी इत्यादी वस्तु बाजारात मांडल्या होत्या अश्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्यामध्ये स्वावलंबन व व्यवसाय करण्याचे धाडस निर्माण करण्याची वृत्ती निर्माण व्हावी म्हणून हा उपक्रम शाळेने राबविला.मुलांचे धाडस पाहून गावातील लोकांनी मुलांचे कौतुक केले,या वेळी विलास पाटील,अर्जुन मुतगेकर,श्रीमती मंगल पाटील,सुजाता म्हेत्रे यांनी बाजाराचे नियोजन केले होते.


No comments:

Post a Comment