तिलारी घाटात बस दरीत कोसळता-कोसळता बचावली, मोठा अनर्थ टळला - चंदगड लाईव्ह न्युज

19 February 2020

तिलारी घाटात बस दरीत कोसळता-कोसळता बचावली, मोठा अनर्थ टळला

तिलारी घाटात वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने बस घाटात कोसळता कोसळता सुदैवाने बचावली. 
चंदगड / प्रतिनिधी
कोल्हापूर येथून पणजीला जाणारी कागल आगाराची बस तिलारी घाटात एसटीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने घाटातील दरीत कोसळता-कोसळता वाचली. यामध्ये यात चालक, वाहकासह तीन प्रवासी असे पाच जण किरकोळ जखमी झाले. यात एका वृद्ध महिलेचा समावेश आहे. आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली.
तिलारी घाटातील वळण.
यासंदर्भात माहीती अशी – बुधवारी सकाळी कोल्हापूर ते पणजी बस क्रमांक (MH 14 BT 3572) ही चालक  घेऊन तिलारी घाटातून खाली उतरत असताना घाटातील जयकर पॉईंट येथे एका धोकादायक उतारू वळणावर बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस सरळ पुढे जाऊन कठड्याला लागून घाटात कोसळता-कोसळता वाचली. या बसमध्ये असलेले प्रवाशी यांना धक्का बसला. यात वाहक चालक तीन प्रवासी असे पाच जण किरकोळ जखमी झाले. यात एका वृद्ध महिलेचा समावेश आहे. यावेळी बस मध्ये एकूण चाळीस प्रवाशी होते. रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे व कठड्यामुळे बस थांबली. अन्यथा बस चारशे फूट खोल दरीत कोसळून मोठी दुर्घटना झाली असती. या अगोदर या ठिकाणी चार ते पाच अपघात झाले असून हा अपघाताचे वळण आहे. सुदैवाने प्रवाशी बस खडी माती ढिगारे येथे अडकून राहिली म्हणून वाचले अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. तिलारी घाटातून ये-जा करणारे कोल्हापूर पणजी-दोडामार्ग या बसेस चालक नेहमीच वेगाने बस हाकतात. त्यामुळे अनेकदा छोटे-मोठे अपघात झाले आहेत. प्रवाशांचा जीव धोक्यात येईल अशा वेगाने बसेस हाकु नयेत अशी सुचना संबंधिक वाहकांना देण्याची गरज आहे. 

No comments:

Post a Comment