तुर्केवाडी विद्यालयाचे अध्यापक बी. एन. पाटील यांना कोजिम प्रेरणा पुरस्कार जाहीर - चंदगड लाईव्ह न्युज

22 February 2020

तुर्केवाडी विद्यालयाचे अध्यापक बी. एन. पाटील यांना कोजिम प्रेरणा पुरस्कार जाहीर

बी. एन. पाटील
माणगाव / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत दिला जाणारा यावर्षीचा कोजिम प्रेरणा पुरस्कार जनता विद्यालय तुर्केवाडी येथील मराठीचे अध्यापक बी.एन. पाटील यांना जाहीर झाला आहे. रविवार दि.२३ रोजी गडकरी हॉल, पेटाळा कोल्हापूर येथे हा कार्यक्रम होणारा आहे. ' गावाकडची माती ' या त्यांच्या पहिल्याच कथासंग्राहाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
सद्या ते चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवुन त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'बागेतल्या कविता' या उपक्रमाचे त्यांनी शतकी प्रयोग केले आहेत. चंदगडी साहित्य रत्न च्या माध्यमातून 'दौलत शब्दांची' या काव्यवाचनाच्या माध्यमातून विविध शाळामधून कार्यक्रमचे यशस्वी आयोजन केले आहे. तालुकास्तरीय हस्ताक्षर स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा यांच्या आयोजनात महत्वाची भूमिका निभावली आहे.दक्षिण साहित्य सभा, बेळगुंदी, कडोली, उचगाव , कोवाड येथील ग्रामीण साहित्य संमेलनात काव्यवाचन केले आहे. पुढील महिन्यात श्री. पाटील यांचा एक कथासंग्रह व कविता संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment