दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
हलकर्णी ( ता.चंदगड )येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व शिवाजी विद्यापीठांतर्गत पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी दहा वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. रवींद्र तेली हे प्रमुख पाहुणे म्हणून स्थानकांना उद्देशून भाषण करतील. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील उपस्थित राहणार आहेत. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अधिसभा सदस्य मल्लापा चौगुले, अध्यक्ष अशोकराव जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील व सचिव विशाल पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. पदवी स्वीकारण्यासाठी स्तानकांनी उपस्थित राहून पदवी स्विकारावी असे आवाहन प्राचार्य डॉ.पी.वाय. निबांळकर,परीक्षा विभाग प्रमुख प्रा.पी.ए. पाटील कार्यालयीन अधीक्षक प्रशांत शेंडे यानी केले आहे.
No comments:
Post a Comment