![]() |
डॉ. आसिफ असलम बागवान यांचा एमबीबीएस पदवी मिळाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉक्टर पी. वाय. निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार. |
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी (ता. चंदगड) येथील रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. ए. एस. बागवान यांचे चिरंजीव डॉ.आसिफ असलम बागवान यांचा एमबीबीएस पदवी मिळाल्याबद्दल सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. वाय. निंबाळकर, निवृत्त प्राचार्य कल्याणराव पुजारी, श्रीराम महाविद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य एस पाटील यांच्या शुभ हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला व त्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी नॅक समन्वयक प्रा.डॉ. आय.आर. जरळी, प्रा.ए.एस. बागवान प्रा.ए.एस. जाधव सर्व प्राध्यापक वर्ग शिक्षक व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. बागवान यांच्या यशाबद्दल सर्वांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले. निवृत्त प्राचार्य कल्याण पुजारी डॉक्टर बागवान यांचा सन्मान केला.
No comments:
Post a Comment