दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
हलकर्णी फाटा (ता. चंदगड) परिसरातील भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. या चोरांचा बंदोबस्त करण्यास पोलीस कर्मचारी कमी पडतात का ? असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांच्यातुन होत आहे. 
हलकर्णी फाटा व पाटणे फाटा ह्या तालुक्यातील दोन महत्त्वाच्या बाजारपेठा आहेत. या ठिकाणी दररोज लाखो रुपयांची उलाढाल तसेच हजारो लोकांची ये-जा असते त्याचाच फायदा भुरटे चोर घेत आहेत. रात्रीच्या वेळी लहान मोठी दुकाने फोडणे, दुचाकी गायब होणे असे प्रकार सध्या याठिकाणी वाढले आहेत. चंदगड पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र जास्त तसेच पोलीस कर्मचारी कमी यामुळे पाटणे फाट्यावरील पोलिस चौकी बहुतांशी बंद दिसते.पोलीस कर्मचाऱ्यांच्या वर कामाचा भार वाढल्यामुळे त्यांचा मानसिक ताण वाढलेला आहे. अशावेळी चोरी झाल्याची फिर्याद देण्यासाठी गेलेल्या ना तुमच्या दुकानात एवढे पैसे होतेच का ? तुमचे साहीत्य ऐवढे कशाला ठेवता ? तुम्हाला काळजी घेता येत नाही का ? असे प्रश्न पोलीस कर्मचारी करतात अशी चर्चा सध्या चोरी झालेल्या नागरिकांच्यात होताना दिसत आहे. चंदगड तालुक्याचे क्षेत्र जास्त व पोलीस कर्मचारी कमी मग अशा वाढत्या गुन्ह्यांना चंदगड पोलिस आवर घालतील का ? असा सवाल मात्र परीसरातील नागरीकांच्यातुन होताना दिसत आहे.
 


 
 
.jpg) 
 
 
 
No comments:
Post a Comment