![]() |
| कार्वे (ता. चंदगड) येथे सरस्वती वाचनालयाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत बोलताना डॉ .रेखा देवकर व इतर. |
"प्राचीन काळात मानव औषधी वनस्पतींचा वापर करून दीर्घायुषी जीवन जगत होता .पण आधुनिक काळात रासायनिक औषधामुळे मानवी जीवन अल्पायुषी ठरले आहे . निसर्गातील प्रत्येक वनस्पतीही मानवाच्या उपयोगाची आहे. त्या वनस्पतींची ओळख करून घेऊन त्याचा औषधी वापर समाजाने आपल्या नित्यनैमित्तिक जीवनात करावा. " असे प्रतिपादन डॉ .रेखा देवकर यांनी केले.
त्या मौजे कार्वे ( ता. चंदगड ) येथील सरस्वती वाचनालयाने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे ' या विषयावर बोलत होत्या . अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध लेखक के.जे. पाटील होते. प्रारंभी अनिल शिवनगेकर आणि सौ. मनिषा शिवणगेकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन झाले. मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रास्ताविक पी . आर . मांडेकर यांनी तर पाहुण्यांचा परिचय डॉ प्रकाश दुकळे यांनी करून दिला.
डॉ. देवकर पुढे म्हणाल्या की, " पिंपळ, उंबर, बेलपान, आपटा, चंदन, खाऊचे पान, लिंबू मिरची, बिब्बा, आंबा, दुर्वा, केळ, रुई, तुळस ,बांबू, कडुलिंब ,वडाचे झाड अशा कित्येक वनस्पती माणसाच्या धार्मिक जीवनात उपयोगाच्या आहेत. या सर्व वनस्पतींचा वापर औषधी गुणांसाठी केला जातो. हे ओळखणे गरजेचे आहे. धार्मिकतेसोबत येणारी पाने, फुले, फळे यांची वैज्ञानिकता समजून घ्यावी. "
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्तिक पाटील यांनी तर आभार सौ. प्राजक्ता दुकळे यांनी मानले. या प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष द.य. कांबळे, सचिव सूर्याजी ओऊळकर, विष्णू कार्वेकर, काजमिल फर्नांडीस ,दयानंद भोगण , विनोद टक्केकर, सौ . रेणुका कांबळे, सौ . शितल ओऊळकर यांची प्रमुख उपस्थिती होती . कार्यक्रमास वाचनालयातील वाचक, बहुसंख्य श्रोते, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन जॉनी फर्नांडीस, सुरेश कांबळे ,श्रीकांत कांबळे, मल्लापा पाटील, गुंडू ओऊळकर यांनी केले.


No comments:
Post a Comment