चंदगड ग्राहक संरक्षण परिषद समितीमार्फत ग्राहक संरक्षण कायद्याबाबत जनजागृती - चंदगड लाईव्ह न्युज

21 February 2020

चंदगड ग्राहक संरक्षण परिषद समितीमार्फत ग्राहक संरक्षण कायद्याबाबत जनजागृती

चंदगड तालुका ग्राहक संरक्षण परिषद समितीच्या प्रांत कार्यालय चंदगडच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुका ग्राहक संरक्षण परिषद समितीच्या प्रांत कार्यालय चंदगडच्या वतीने नुकताच तालुक्यातील ग्रामपंचायत,शासकीय कार्यालय व शाळाना भेट देवून ग्राहक संरक्षणाचे महत्त्व पटवून देवून जनजागृती अभियान चार दिवस राबविण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मनोज रावराणे, तालुका महिला अध्यक्ष निलम प्रसाद कोदाळकर,राजेंद्र किरमटे,महासचिव शशिकांत मातोंडकर,रायमन फर्नांडिस,गजानन पाटील,एन.जी.गावडे,प्रकाश निटूरकर,संदिप पाटील, कोमल पाटील,संदेश पाटील, लक्ष्मण पाटील आदी  उपस्थित होते.
तसेच ग्राहक संरक्षण प्रांत कार्यालय चंदगड (पाटणे फाटा) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त फोटो पुजन करून शिवजयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी आदर व्यक्त करणारे वक्तव्य श्री. रावराणे व श्री. कोदाळकर यांनी केले.

No comments:

Post a Comment