शिनोळी (ता. चंदगड) येथे शिनोळी ते रायगड शिवज्योत घेउन पायी प्रवास केलेल्या सोळा मावळ्यांचा सत्कार झाला. |
शिनोळी खुर्द ते रायगड असा ४८६ कीलोमीटर शिवज्योत घेउन पायी प्रवास केलेल्या सोळा मावळ्यांचा प्रभाकर खांडेकर युवा फाऊंडेशनच्या वतीने शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला. शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ देउन सत्कार १६ मावळ्यांचा सत्कार करण्यात आला.
शिवजंयतीच्या पार्श्वभूमीवर शिनोळी खुर्द येथील प्रदिप पाटील, प्रितम पाटील, किसन काकतकर, गजानन सांबरेकर, राकेश तरवाळ, जयराम तरवाळ, आकाश पाटील, सतिष पाटील, अंकित पाटील, आमर बोकमुरकर, पवन पाटील, महादेव पाटील, गुरुप्रसाद पाटील, सुरज मन्नोळकर, पुंडलिक ओऊळकर, गौतम पाटील या सोळा मावळ्यानी शिवज्योत घेऊन 486 कि. मी. प्रवास केला. सरपंच सौ नंम्रता पाटील, सदस्य भारती पाटील, जयश्री तरवाळ, सौ. गुणवंता ओऊळकर, उद्योजक बाळासाहेब पाटील, शिवाजी खांडेकर, गजानन पाटील, ग्रामसेवक वि. पी. नाईक, प्रशांत ग. पाटील, प्रशांत नि. पाटील, आजित खांडेकर, किसन यादो पाटील, निंगाप्पा पाटील, माजी सरपंच भरमा वै पाटील व सर्व गावकरी तरुण वर्ग, शिवप्रेमी, शेतकरी बांधव व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment