कार्वे येथील वाचनालयाच्या वतीने आयोजित व्याख्यानमाला
कार्वे / प्रतिनिधी
![]() |
कार्वे (ता. चंदगड) येथे सरस्वती वाचनालयाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत बोलताना प्रा. मायाप्पा पाटील. |
पुस्तके माणसाला माणूसपण शिकवतात. ती जन्म आणि मृत्यू यामधील प्रवास सुखकर करण्याचे काम करतात. पुस्तकांच्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, अब्दुल कलाम, सुधा मूर्ती, मार्क झुकेरबर्ग, ज्ञानेश्वर मुळे,विश्वास नांगरे -पाटील आदी व्यक्तिमत्त्वे घडली. पुस्तके माणसाची मस्तके घडवितात. अंतर्मनाच्या सशक्तीकरणासाठी पुस्तकं वाचणे गरजेचे आहे. पुस्तकं वाचणे म्हणजे बौद्धिक गुंतवणुक होय, मानवी जीवनाचे संचित पुस्तकात सामावले आहे असे प्रतिपादन प्रा. मायाप्पा पाटील यांनी केले.
मौजे कारवे (ता. चंदगड) येथील सरस्वती वाचनालयाने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत प्रथम पुष्प गुंफताना 'वाचाल तर वाचाल ' या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी चंदगड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर होत्या. प्रारंभी पं. स. सदस्य दयानंद काणेकर यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले. जोतिबा आपके, दयानंद भोगण आणि मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले. याप्रसंगी उत्कृष्ट बालवाचकांचा सत्कार करण्यात आला. पं. स. सदस्य दयानंद काणेकर यांनी मोबाईल, टि.व्ही. मुळे वाचन संस्कृतीच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. वाचन संस्कृती वाचवायची असेल तर गावागावात व्याख्यानमाला घेणेसाठी जनजागृती करावी. द. य. कांबळे, सूर्याजी ओऊळकर, व्ही. जे. पाटील प्रमुख उपस्थिती होते. विष्णू कार्वेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पी. आर. मांडेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्तिक पाटील यांनी सूत्रसंचालन तर डॉ. प्रकाश दुकळे यांनी आभार मानले. जॉनी फर्नांडीस, सुरेश कांबळे, श्रीकांत कांबळे, मल्लाप्पा पाटील, गुंडूराव ओऊळकर आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
No comments:
Post a Comment