चंदगड / प्रतिनिधी
आयुष्यात कोणत्याही संकटाला हरवायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून डोळ्यासमोर ठेवा, या जगातल कोणतच संकट तुमचा पराभव करू शकणार नाही असे मत युवाव्याख्याते शिवश्री नंदकिशोर गावडे यांनी मांडलं. जट्टेवाडी (ता. चंदगड) येथील पांढरीदेवी तरुण मंडळामार्फत शिवजयंती निमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच पी. डी. पाटिल होते. श्री. गावडे म्हणाले, ``आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त अफजलखानाचा वधपुरता व शायिस्ताखानाच्या बोटापुरता मर्यादित ठेवले. पण शिवाजी महाराज हे अफजलखानाच्या वधापुढे सुद्धा जाऊन पोहचतात, अनेक राष्ट्र ही शिवाजी महाराज्यांवर अभ्यास करताहेत. यावेळी शेतकऱ्यांची, आजची स्थिती व शिवकालीन शेतकरी यामध्ये नेमके साम्य काय होते ते स्पष्ट केले. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात एका सुद्धा शेतकऱ्याने आत्महत्या केली नव्हती. पण आज दिवसा-दिवसाला शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. पुढे जाऊन महिलांच्या संदर्भात बोलत असताना, शिवाजी महाराजांच्या राज्यात स्त्रियांना 50 टक्के आरक्षण नसताना देखील 100% संरक्षण होते. पण ...पण आज हिंजवडी, निर्भया, कोपर्डी ही प्रकरण बघता आजची स्त्री सुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. या व्याख्यानासाठी ग्रामस्थ उपस्थित होते. आभार एम.आर. पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment